Breaking

सोमवार, २२ मे, २०२३

आज प्रकाशित झालेले ग्रंथ हे नैतिक तत्वज्ञान घडविणारे व दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करणारे : प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादन


पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी व मार्गदर्शन करताना प्राचार्य राजेंद्र कुंभार व ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, जयसिंगपूर - शिरोळ शाखा, तीर्थंकर फौंडेशन- तीर्थंकर मासिक व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मराठी विभाग (पदवी व पदव्युत्तर) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २१ मे २०२३ रोजी पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.प्रमुख अतिथी माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार व  समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. तारा भवाळकर होत्या. यावेळी डॉ. सुरेश पाटील,राजन मुटाणे, रावसाहेब पुजारी, महेंद्र पाटोळे, राजाभाऊ अन्नदाते प्राचार्य,डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

     प्रारंभिक प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात व कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना साहित्य परिषदेची माहिती दिली.तसेच पुस्तका संदर्भात थोडक्यात विवेचन करताना ते म्हणाले, संत साहित्य व जैन तत्वज्ञानावर लिहिलेले पुस्तकांची समीक्षा होणार आहे.

      ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.महावीर.अक्कोळे लिखित 'संतांचा तो संग नव्हे भलतैसा..'.,लेखिका सौ. सुनेत्रा नकाते यांचे 'जैन कथंनंतरची कथा',लेखक प्रा. डॉ. बाबा बोराडे लिखित.'तीर्थंकर भ. महावीर वर्धमान',लेखक स्व. सुमेरचंद जैन 'आचार्यश्री आर्यनंदी जीवनगाथा' या (पुस्तकाची दुसरी आवृत्ती) व लेखक मा.पाटोळे या पाच लेखकांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले.

       याप्रसंगी प्रा.अनिल पाटील, डॉ.सौ. आलासे मॅडम, प्रसिद्ध लेखिका सौ.नीलम ताई माणगावे,श्री. व प्रा. कबीर कुंभार यांनी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या अंतरंगाचे वैशिष्ट्ये व सखोल विश्लेषण व परिपूर्ण समीक्षा करण्यात आली.

  यावेळी लेखक डॉ.महावीर अक्कोळे, लेखिका सौ. सुनेत्रा नकाते व लेखक प्रा. डॉ. बाबा बोराडे यांनी आपली मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाबाबत ऋणनिर्देश व्यक्त केले.

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी "नैतिक तत्वज्ञान घडविणारे व दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करणारे सदरचे ग्रंथ आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले. मुळात जैन तत्वज्ञान हे हिंसाविरोधी आयुष्याची लढाई निर्माण करणार आहे. जैन,बौद्ध ,लिंगायत व वारकरी समुदायांनी एकत्रित येऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात एकसंघ झाले पाहिजे. येणारा काळ हा अत्यंत धोकादायक असून त्यासाठी वज्रमूठ भक्कम केली पाहिजे. जैन तत्वज्ञान हे ज्ञान.आणि विज्ञानधिस्थित  तत्त्वज्ञान असून सदरच्या ग्रंथांनी जैन तत्वज्ञान व साहित्य सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

     अध्यक्षस्थाना वरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, मन व मेंदू जागृत ठेवून जीवन निरामय बनवणे. त्याचबरोबर आत्मशोधाचा भाग असणे ही पुस्तकाचे काम आहे. आज प्रकाशित झालेली पुस्तके ही त्याच ताकदीचे व परिपूर्ण आहेत.

      या कार्यक्रमाचे आभार शिरोळ साहित्य परिषदेचे सचिव, संजय सुतार यांनी मानले. तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. सुनील चौगुले व अंजना चौगुले-चावरे यांनी केले.

     संयोजकाकडून या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 टिप्पणी: