![]() |
पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिड्डे, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपुर : जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं 159/2023 भा.दं.वि.सं.कलम 380 प्रमाणे फिर्यादी नामे मिरासो मकबूल बागसार वय 49 वर्ष व्य- चहा दूकान रा. आंबेडकर चौक बागसार गल्ली, निमशिरगाव ता शिरोळ यांनी पोलीस ठाणेस तक्रार दिली की, दि.14/05/2023 रोजी 19.00 वा. ते रात्री 21.30 वा. चे दरम्यान त्यांचे परिचयाची रेश्मा शेख रा. कुडची ता. अथणी जि.बेळगांव (पुर्ण नाव माहीत नाही) ही घराचा वास्तुदोष काढणेसाठी उतारा उतरावा लागेल त्यासाठी घरामध्ये विधी करुन देतो असे सांगुन सदर विधीचे वेळी घरातील बायकांना घराबाहेर ठेवा, असे सांगुन घरात पुजा करताना फिर्यादी यांना देखील घराबाहेर थांबणेस सांगुन घराच्या दारे खिडक्या बंद केल्या त्यानंतर एक तासांनी घराचा मुख्य दरवाजा उघडुन विधीचा उतारा टाकणेसाठी फिर्यादींचेकडे दिला. त्यानंतर दुसरे दिशी फिर्यादी व त्यांचे घरातील सदस्य लग्नाला जाणार असलेने घरातील लोखंडी तिजोरीतील खालील वर्णनाचे सोनेनाणे व पैसे यांची चोरी झालेचे फिर्यादीचे निदर्शनास आले. 2,00,000 /- त्यात प्रत्येकी 25 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या गोफ डिझाइनच्या दोन चेन 50,000/- अंदाजे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठन त्यामध्ये सोन्याचे बिनलाखी अष्टपैल डिझाइनचे 80 मणी 40,000/- अंदाजे एक तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस एक 50,000/- अंदाजे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे चेनमधील मंगळसुत्र एक ,50,000/- अंदाजे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टीमधील मंगळसुत्र एक ,6800/- रुपये त्यात भारतीय चलनी दराच्या 500, 200, 100 रुपयेच्या चलनी नोटा मिळुन एकूण – 3,96,800/- व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 3,96,800 /- रुपये किमतीचा मुददेमाल फिर्यादीचे राहते घरात असलेल्या तिजोरीतून रेश्मा शेख हिने चोरून नेलेबाबत संशय असलेची तक्रार जयसिंगपुर पोलीस ठाणे येथे दिली त्यावरुन तिचेविरुध्द दि. 15/05/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे- पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर वैजणे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास निकम, रोहीत डावाळे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील अमर वासुदेव यांनी तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीचा शोध घेवुन त्यास मंगसुळी ता. कागवाड जि.बेळगांव राज्य- कर्नाटक याठिकाणी सापळा रचुन त्यास शिताफिने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव रेश्मा उर्फ महंमद हानिफ हुसेनसाब शेख ( तृतीयपंती) व. व 54 रा. कुडची ता. अथणी जि.बेळगांव राज्य कर्नाटक सध्या रा. मंगसुळी ता. कागवाड जि. बेळगांव राज्य- कर्नाटक असे सांगितले. सदर गुन्ह्याबाबत आरोपीकडे कसून तपास केला असता सदर गुन्हा त्याने केला असलेचे कबुल केले आहे.
सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण 3,96,800/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम निवेदन पंचनाम्याने जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या पुढील तपास महिला पोलीस हवालदार प्रभावती सावंत या करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा