![]() |
सुप्रसिद्ध कवीवर्य ग्रेस |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये कविवर्य ग्रेस यांच्या वाढदिवसानिमित्त 'चांदवा धुक्यातला' यावर कविता सादरीकरण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती डॉ. महावीर अक्कोळे यांनी दिली.
१० मे हा मंत्रकवी कवीवर्य ग्रेस यांचा जन्मदिवस हे औचित्य साधून, अवघ्या महाराष्ट्रावर व मराठी मनावर अखंड गारुड करणाऱ्या या कवीच्या अलौकिक काव्य प्रतिभेचा, कवितेचा रसास्वाद सादर होणार आहे.मराठी रसिका वर आपल्या काव्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनाला भावस्पर्श करणारा अलौकिक कार्यक्रम 'चांदवा धुक्यातला' ग्रेस' यावर कविता सादरीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काव्य रसाची मेजवानी मिळणार आहे.
या कार्यक्रमातील काव्य सादरीकरण जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक चळवळीतील आघाडीचे शिलेदार डॉ. महावीर अक्कोळे तसेच प्रसिद्ध लेखिका व कवयित्री सौ. सुनेत्रा नकाते व प्रा. सौ. सुरेखा इसराणा करणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद्, जयसिंगपूर - शिरोळ शाखा व जयसिंगपूर कॉलेज, मराठी विभाग (पदवी व पदव्यूत्तर) यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विलक्षण आणि विचक्षण कवीचा हळवा आणि आर्तव्याकूळ काव्यास्वाद रसिकांना मिळणार आहे. तरी या कार्यक्रमास साहित्यप्रेमी व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम रविवार २८ मे,२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता जयसिंगपूर कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजित केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा