![]() |
एरंडोली येथे पत्नीने नवऱ्याचा केला खून |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
मिरज : बेडग येथे सख्ख्या मुलाने वडिलांचा ट्रॅक्टर अंगावर घालून खून केल्याचे घटना घडलेली घटना ताजी असताना एरंडोली येथे पारधी बेघर वस्तीवर पत्नीने चाकूने भोकसून पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. पारधी वस्तीवर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मिरज ग्रामीण पोलिसांची मात्र ग्रामीण हद्दीत दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्यामुळे मोठी धावपळ उडाली होती. सुभेदार आनंदराव काळे वय वर्ष ४५ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.त्याची पत्नी चांदणी काळे आणि पती सुभेदार काळे यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला या वादात चांदणी हिने धारधार शस्त्राने सुभेदार काळे यांच्या छातीत वार केला या वादामध्ये चांदणीवरही सुभेदार हिने चाकूने हल्ला केल्याचे समजते. जेवण करण्याच्या कारणावरून वाद झाल्याची पारधी वस्तीवर चर्चा सुरू होती.चांदणी काळे ही घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली असून मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी चांदणी काळे हिचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत.
या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा