Breaking

गुरुवार, २५ मे, २०२३

*अत्यंत दुर्देवी! बेडगेमध्ये मुलानेच केला बापाचा खून ; मुलगा घटनास्थळावरून फरार*


मुलग्याने बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून केला खून

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


मिरज : उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या बापाच्या अंगावर ट्रॅक्टर  घालून मुलाने खून केल्याची घटना बेडग स्टेशन रोड मलगाव या ठिकाणी ही आज घटना घडली आहे.

      दाजी  उर्फ दादू गणपती  आकळे उर्फ उप्पार वय वर्ष ५५ यांचा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने जागीच ठार झाले आहेत. दादू अकळे हे  मुलगा  लक्ष्मण दादू उर्फ दाजी आकळे वय 31 याला  उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. यावेळी  वडील आणि मुला मध्ये झालेल्या वादातून मुलाने वडिलांच्या  अंगावर ट्रॅक्टर घालून खून केला आहे. ही घटना समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हॉस्पिटल घेऊन घटनास्थळावर दाखल झाले होते.मुलगा लक्ष्मण आकळे हा घटनास्थळावरून पसार झाला असून मिरज ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    लक्ष्मण आकळे यांनी वडीलाकडून उसने ८० हजार रुपये घेतले होते. उसनवारीने घेतलेल्या रकमेची मागणीसाठी आज त्याचे वडील मयत दादू आकडे हे गेले असता मुलाने वडिलांचा जीव घेतला.

       या घटनेने आरग- बेडग परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा