Breaking

गुरुवार, २२ जून, २०२३

*डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजी'च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक राधानगरी धरणास अभ्यास भेट*


राधानगरी धरणास डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल भेट

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधील प्रथम वर्ष इंजिनीरिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राधानगरी धरणास भेट आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील यांनी दिली.

     डिपार्टमेंट ऑफ टेकनॉलॉजिचे प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली प्रथम वर्ष इंजिनीरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बेसिक सिव्हिल इंजिनीरिंग या विषयाअंतर्गत फील्ड व्हिजीट हा अभ्यासक्रम असले कारणाने अभ्यासाचा भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटी मध्ये धरणाची उंची, साठवण क्षमता तसेच वीज निर्मिती केंद्र याशिवाय विविध भागांची पाहणी केली. राधानगरी धरणातील संबंधित कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. धरणाचे कार्य व त्यासंबंधी विविध प्रकार याची तेथील पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. या भेटीचा उपयोग प्रथमवर्ष विभागातील विद्यार्थ्यांना मूलभूत स्थापत्य समजण्यासाठी होणार आहे. 

     यामध्ये प्रथमवर्ष इंजिनीरिंग विभागातील ८० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही भेट यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. महेश साळुंखे, प्रा. महेश लोखंडे आणि वैशाली शित्तूरकर आदींसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा