Breaking

रविवार, २५ जून, २०२३

*कुटवाडच्या शेतकऱ्याच्या पोराने रोवला कर्तुत्वाचा झेंडा, मिळवलं लेफ्टनंट पद*

 

कुटवाडचा सुपुत्र बनला लेफ्टनंट


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


 शिरोळ : शिरोळ तालुक्यातील साडेतीन ते चार हजार लोकवस्तीचं कुटवाड हे गाव, याच गावातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेला युवक प्रतीक परशराम पाटील वय 23 या तरुण युवकाने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सैन्य दलातील लेफ्टनंट या पदावर ते नियुक्त झालेले आहेत. कठीण परिश्रम आणि अथक प्रयत्नातून या पदापर्यंत तो युवक पोहोचला आहे.

    ग्रामीण भागामध्ये आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असते. या शेतकरी बापाने जय जवान जय किसान या वाक्याला साजेल असं स्वप्न उराशी बांधलं आणि माझ्या पोरानं या भारत मातेचे रक्षण करावं असा चंगच बांधला.

   प्रतिकने आपले प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते पाचवी कुटवाड च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण केले.पाचवीला असताना त्यांने  सैनिकी  शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची जी परीक्षा असते.त्याची तयारी सुरू केली व त्याच वर्षी परीक्षा दिली या प्रवेश परीक्षेत तो उत्तीर्ण झाला या परीक्षेमध्ये लेखी वैद्यकीय व मुलाखत अशा विविध टप्प्यामधून निवड होऊन सैनिकी स्कूल सातारा येथे सहावी साठी प्रवेश मिळवले.

  सहावी ते बारावी पर्यंत यांनी आपले शिक्षण सैनिकी स्कूल सातारा  येथे घेतले, महाराष्ट्रामध्ये ही एकच शासकीय सैनिकी स्कूल आहे व विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेले हे भारतातील पहिलं शासकीय सैनिक स्कूल आहे. बारावीला असताना 2017 यावर्षी नोव्हेंबर मध्ये पहिल्यांदा एनडीए ची परीक्षा दिली,यामध्ये अपयश आल्यानंतर 2018 यावर्षी एप्रिल मध्ये परीक्षा दिली यामध्ये सुद्धा अपयश आले. त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये ही परीक्षा दिली यावेळी मात्र चांगल्या गुणांनी प्रतिक उत्तीर्ण झाला.

   एनडीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षे खडकवासला पुणे येथे जून 2019 ते 2022 पर्यंत सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले यानंतर लगेचच देहराडून जुलै 2022 ते 10 जुलै 2023 पर्यंत एक वर्ष अजून एक सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर लेफ्टनंट या पदाची रँक मिळाली व शपथविधीही देहराडून येथेच पार पडले.

   कुटवाड सह पंचक्रोशी मध्ये या पदावरती पोहोचणार हा पहिलाच आहे. यानंतरनं अलाहाबाद येथे सेवेत रुजू झाले. या एनडीएच्या परीक्षेमध्ये  पाच दिवस मुलाखत, मैदानी सायकॉलॉजिकल अशा टेस्ट होतात व दहा दिवस वैद्यकीय परीक्षा होते. या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये 259 स्थान याला मिळाले होते.प्रत्येक वर्षी दोन वेळा ही एनडीएची परीक्षा होते आणि या परीक्षेमध्ये 600 पदे लेफ्टनंट ची असतात.

   वडिलांची तीव्र इच्छा होती देश सेवेसाठी आपल्या मुलाने आपला आयुष्य घालावं. तिच्या आपल्या मुलाने पूर्ण केले. या यशासाठी  आई वडील काका व संपूर्ण  कुटुंबीयांचे शिक्षकांचे योगदान लाभले.

    जय हिंद न्यूज नेटवर्क बोलताना प्रतिक ने सांगितले की, आपल्या शिरोळ  तालुक्यातील युवकांनी एनडीए देशसेवेच्या परीक्षांची तयारी करावी त्यासाठी नेहमीच मी युवकांना मार्गदर्शन करेन.

   या कार्याची दखल घेऊन  कुटवाड सह पंचक्रोशीतील लोकांनी लेफ्टनंट प्रतीक पाटील चा जाहीर सत्कार व सन्मान करण्यात आला.

    याप्रसंगी आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी आमदार उल्हासदादा पाटील, गणपतराव पाटील, सावकर मादनाईक, पृथ्वीराज यादव, संजय माने, दिनकर घाडगे, विजय पाटील,विठ्ठल मोरे हे सर्वजण उपस्थित होते. तसेच मा.निवृत्त  ब्रिगेडियर श्री सुधीरजी सावंत यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व सेवा संस्था पदाधिकारी तरुण मंडळ व ग्रामस्थ कुटवाड, कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा