![]() |
मुख्याध्यापक सुनील कोळी सर नवागत विद्यार्थी, मा. चंद्रकांत जाधव व अन्य मान्यवरांचे स्वागत करताना |
*सौ.गीता माने : सहसंपादक*
जयसिंगपूर : श्रीमती यशोदा मालू शिशुमंदिर जयसिंगपूर मध्ये बालवाडी पूर्वगटाचे नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे आज मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व पेढे देऊन मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य मा.आनंदकिशोर मालू, स्कूल कमिटी सदस्य मा.चंद्रकांत जाधव (बापू), सल्लागार समितीचे सदस्य मा. प्रसन्ना कुंभोजकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मा.डॉ.अजिंक्य वरेकर, लक्ष्मीनारायण मालु हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.आर.आय.पवार सर व कै. श्रीरामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर व शिशु मंदिरचे मुख्याध्यापक सुनील कोळी सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षीप्रमाणे श्रीमती यशोदा मालू शिशुमंदिर मध्ये नवागतांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम जल्लोषात संपन्न होत असतो. नवीन येणारा शिशु अर्थात प्रवेशित बालक विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी असणारी मनातील भीती घालवणे, शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील हा ऐतिहासिक व महत्वपूर्ण प्रथम क्षण असल्याने त्याचा आनंदोत्सव साजरा करणे त्याचबरोबर पालकांच्या मध्ये शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते विषयी विश्वास संपादन करणे हा मुख्य हेतू असतो.
प्रारंभिक मुख्याध्यापक सुनील कोळी सरांनी शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थी बालक-पालक व प्रमुख पाहुणे यांचं स्वागत करण्यात आले. अत्यंत उत्तम नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे नवागत विद्यार्थी बालक यांचे स्वागत औक्षण करून प्रमुख पाहुणे, मान्यवर व शिक्षकांच्या हस्ते गुलाब पुष्प व पेढे देऊन करण्यात आले. नवीन प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थी बालकावर सर्व शिक्षकांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, आकर्षित करणारा स्वागत बोर्ड, स्वागतासाठी बनवलेली आकर्षक फुग्यांची कमान, रेड कार्पेटची व्यवस्था, सुंदर अशी फुलांची सजावट, विविध पशु व आवडते कार्टून कलाकारांचे कट आउट लावण्यात आले होते, रेड कार्पेट वरून प्रवेशित बालक व त्यांचे पालक चालत असताना पुष्पवृष्टी, प्रत्येक बालकास औक्षण करून गुलाब पुष्प व पेढे वाटप, यानंतर सुंदर रित्या बनवलेल्या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांचा फोटो काढला जात होता, सरते शेवटी विद्यार्थी हा वर्गात आल्यानंतर टाळ्या वाजवून प्रसन्न वातावरणात त्याचे स्वागत केले जात होते.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर पालकांची संख्या प्रचंड होती.
सदर प्रवेशोत्सव व स्वागतोत्सवा बद्दल पालक वर्गाकडून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा