Breaking

मंगळवार, २७ जून, २०२३

*छ. शाहू महाराज हे समताधिष्ठित, लोककल्याणकारी व कृतिशील राजा : प्रा.डॉ. प्रभाकर माने यांचे प्रतिपादन*


.शाहू जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक, प्रा.डॉ. गौतम ढाले

*प्रा. चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : भारताच्या इतिहासामध्ये एक समताधिष्ठित व लोककल्याणकारी राजा म्हणून छ. शाहू राजांनी आपली कारकीर्द कृतीच्या माध्यमातून अजरामर केली असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा.डॉ. प्रभाकर माने (जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर) केले ते जी.के.जी.कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे राजर्षी छ.शाहू जयंती व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक उपस्थित होते.

        सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.गौतम ढाले  यांनी मान्यवरांचे स्वागत करून छ.शाहू जयंती व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.तसेच प्रशासकीय सेविका सौ.पद्मश्री पाटील यांचे हस्ते सुरुवातीस वृक्षारोपण करण्यात आले.

     यावेळी प्रा.डॉ. प्रभाकर माने मार्गदर्शन करताना म्हणाले,.शाहू महाराजांचे कार्य हे शैक्षणिक, सामाजिक, कला,क्रीडा व संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय असून याविषयी सर्वत्र चर्चा केली जाते. मात्र शाहू राजानी शेती व शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतीच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. यामध्ये कृषी महाविद्यालय, शेतीतील नाविन्यपूर्ण चहा,कॉफी,वेलदोडे व घायपात याचे उपक्रम-कृतीशील प्रयोग, कृषी प्रदर्शने, औद्योगीकरणाला चालना,शेतीच्या विकासासाठी जलसिंचनाची व्यवस्था राधानगरी धरणाची महत्वकांक्षी योजना त्याचबरोबर गावागावात विहीर खुदाई, तलाव-कालवे तसेच नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे मातीचे बंधारे बांधून पाण्याची सोय करून दिली. शेतकऱ्याच्या सन्मानासाठी माल खरेदी करणे,त्यांना रास्त भाव मिळवून देणे यासाठी ते प्रयत्नशील होते. राजा कसा असावा यासाठीचा परिपाठ त्यांनी समाजासमोर घालून दिला. एक आदर्शवत,कृतीशील व रयतेचा राजा म्हणूनच त्यांनी आपली २८ वर्षाची राजकीय कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण केली.

     अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा.डॉ.धनंजय कर्णिक म्हणाले, छ. शाहू राजानी आखीव रेखीव व नियोजनबद्ध जयसिंगपूर शहराची निर्मिती केली. शहरात व्यापाराला चालना दिली. संस्थानात स्वखर्चातून मिरज ते कोल्हापूर  रेल्वे मार्ग सुरू करून एक प्रकारे शेती व व्यापारी विकासाला चालना दिली. सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणला.

    या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.संदीप रावळ यांनी मानले. सदर कार्यक्रमास नॅक कॉर्डिनेटर प्रा.डॉ.उमाजी पाटील, प्रा.आर.एस.पाटील, प्रा.डॉ.माधुरी शिंदे,ज्युनियर कॉलेजचे प्रमुख प्रा.सलीम मुजावर, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचा उत्तम आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख व कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. गौतम ढाले व एन एस एस विद्यार्थ्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा