Breaking

गुरुवार, २९ जून, २०२३

*देशाच्या चिरंतन विकासासाठी महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग व युनिसेफ पुरस्कृत ग्रीन क्लब योजना फलदायी : प्र.कुलसचिव प्रा.डॉ. विलास शिंदे यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना कुलसचिव प्रा.डॉ.विलास शिंदे,सोबत श्रीमती प्रतिभा दीक्षित, प्रा.डॉ. पी. टी. गायकवाड, प्रा.डॉ.तानाजी चौगले,प्रा.डॉ. सिद्धार्थ शिंदे व प्रा.डॉ. ज्ञानराजा चिघळीकर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : देशाच्या चिरंतन विकासासाठी  महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग व युनिसेफ पुरस्कृत ग्रीन क्लब योजना फलदायी असल्याबाबतचे प्रतिपादन प्र.कुलसचिव प्रा.डॉ. विलास शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कक्षाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत बहुमोल मार्गदर्शन केले.

    महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग व युनिसेफ पुरस्कृत "नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन आणि पाणी बचत" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा शिवाजी विद्यापीठाच्या निलांबरी हॉलमध्ये मंगळवार दि. २७ जून २०२३ रोजी  पार पडली. 

मार्गदर्शन करताना राज्य नोडल अधिकारी श्रीमती प्रतिभा दीक्षित


    कार्यशाळेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव मा.प्रा. डॉ.विलास एन. शिंदे यांचे हस्ते आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य मा. सिध्दार्थ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी श्रीमती प्रतिभा दिक्षित, प्रा.डॉ.पी. टी.गायकवाड,प्रा.डॉ. तानाजी चौगले,प्रा.डॉ. ज्ञानराजा चिघळीकर उपस्थित होते.

  महाराष्ट्र शासन व युनिसेफ पुरस्कृत या अभियानाच्या राज्य नोडल अधिकारी श्रीमती प्रतिभा दिक्षित यांनी सदरच्या कार्यशाळेचा उद्देश विषद करुन या कार्यशाळेच्या माध्यमातून रचनात्मक  कार्याबरोबर राष्ट्रीय कार्य घडणार आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे उदात्त कार्य करूया.

    प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक मा. प्रा.डॉ. पी. टी. गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर व प्रशिक्षणार्थी यांचे स्वागत केले.  

    याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. सिध्दार्थ शिंदे यांनी शाश्वत विकासाबाबत उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे जलदूत व प्र-कुलसचिव प्रा.डॉ.विलास एन. शिंदे यांनी हवा, पाणी, पर्यावरण रक्षण व संवर्धन याबाबत वास्तव मांडून चिरंतर विकासासाठी सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याकामी विद्यापीठाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

     राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक मा. प्रा.डॉ.तानाजी एम. चौगले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचलन डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी केले.

   या कार्यशाळे प्रंसगी कोल्हापूर जिल्हा नोडल अधिकारी डॉ. ज्ञानराजा  चिघळीकर, प्रा. डॉ. एन. एम. पाटील, डॉ. महादेव कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. एस. ए. सोनवने यांची उदबोधनपर विविध विषयांवर कार्यप्रवण करण्यासाठी कृतिशील व्याख्याने सादर झाली

   या कार्यशाळेच्या आयोजनासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरु मा. प्रा. डॉ. पी. एस. पाटील व प्रा.डॉ. हेमंत कठरे सहसंचालक, उशि विभाग, कोल्हापूर यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 

       या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून सदर कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र शासन व युनिसेफ पुरस्कृत योजनेचा प्रचार व प्रसार नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन कसं करता येईल यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रीन क्लबचे सभासद विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याबाबत ही मते व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा