![]() |
प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर |
✍🏼 पत्रकार मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
सांगली : जगातील सर्वात अवघड असणारी साऊथ आफ्रिका येथील ९६ वी कॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धा सांगली येथील प्राध्यापक डॉ. नवनाथ इंदलकर यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली. १२ तास वेळ मर्यादा असणारी ही मॅरेथॉन त्यांनी ११ तास ४२ मिनिटात पूर्ण केली. साऊथ आफ्रिका येथील पिटरमारित्झबर्ग ते डर्बन अशी ही स्पर्धा आयोजित केली गेली होती.
प्रा.डॉ.इंदलकर हे श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी कॉलेज कडून त्यांचा कौतुक सोहळा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचे कोच श्री किरण साहु यांचाही सत्कार करण्यात आला.
![]() |
कोच किरण साहु यांचा सत्कार |
अनुभव मांडताना डॉ.इंदलकर म्हणाले की ही स्पर्धा स्वतःच्या क्षमतांची परीक्षा घेणारी होती. स्पर्धा सुरू होताना ४ डिग्री तापमानापासुन ते स्पर्धा संपेपर्यंत ३० डिग्री इतका खडतर तापमान फरक अनुभवायला आला. पत्नी, सहकारी, मित्र आणि विद्यार्थी या सर्वांच्या सदिच्छामुळेच ही स्पर्धा पूर्ण शकल्याचे ते म्हणाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कोच साहु म्हणाले की कॉम्रेडस् मॅरेथॉन सारखी अल्ट्रा रन स्पर्धा पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षाचे रनिंग बॅक ग्राउंड लागते पण प्रा.इंदलकर यांनी एका वर्षाच्या करिअर मध्येच पहिल्याच प्रयत्नात ही स्पर्धा पूर्ण करून एक आदर्श निर्माण केला आहे. मी त्यांचा गुरू आहे याचा मला अभिमान वाटतो.
आपल्या एका वर्षाच्या करिअर मध्ये प्रा.डॉ.नवनाथ इंदलकर यांनी गोवा आयर्नमॅन, कोल्हापूर आयर्नमॅन, मुंबई टाटा मॅरेथॉन, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दलाकडून आयोजित २०० किलो मीटर सायकलिंग स्पर्धेत डॉ.इंदलकर यांनी महाराष्ट्रातून प्रथम तर पूर्ण देशभरातून चौथा क्रमांक पटकावला होता. सांगली ते गोवा १८० किलो मीटर, रोटरी क्लब इचलकरंजी द्वारा आयोजित १०० किलो मीटर, कराड स्पोर्ट्स क्लब आयोजित ५० किलो मीटर सायकलिंग स्पर्धा, तसेच २१ किलो मीटर धावणे ( marathon) अशा विविध स्पर्धेत यांनी उत्तुंग असे यश मिळवले आहे.
कॉलेजच्या व्यस्त घडीतूनही प्रा.इंदलकर यांनी मिळवलेले यश खूप कौतुकास्पद असल्याचे मत कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ.बी.मरजे सरांनी मांडले. सांगली शिक्षण संस्थेमधील सेवक वर्गातून कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेले इंदलकर हे प्रथम असल्याने आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान असल्याचे सांगितले.
![]() |
सर्व सहकारी शिक्षक वर्ग |
यावेळी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रोफेसर डॉ.सुशील कुमार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.युवराज पवार, ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव, प्राध्यापक दयानंद बोंदर, गायत्री जाधव, सुनील पाटील, वैशाली गायकवाड, विनया लोखंडे, शुभदा पाटील, क. आ. माने तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.एड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा