Breaking

शुक्रवार, १६ जून, २०२३

*महावितरण कंपनीचा १८ वा वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा*

 

प्रमुख पाहुणे परेश भागवत यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना अधिकारी व कर्मचारी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : महावितरण कंपनीचा १८ वा वर्धापन दिन कोल्हापूर मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक ६ जून २०२३ रोजी सकाळी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सभागृह इचलकरंजी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. श्री परेश भागवत (मुख्य अभियंता, कोल्हापूर परिमंडळ) व अध्यक्ष मा.श्री अंकुर कावळे (अधीक्षक अभियंता,कोल्हापूर मंडळ) उपस्थित होते.


     ग्राहकांना दर्जेदार वीज सेवा देऊन राज्य व देशाच्या शाश्वत विकासात योगदान देणाऱ्या व महावितरण कंपनीच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी करून कोल्हापूर मंडळाचा राज्यात नावलौकिक करणाऱ्या जयसिंगपूर विभागा मधील अधिकारी आणि कर्मचारी यांचा कार्यक्रमात ऊर्जा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . यामध्ये मा.श्री वैभव गोंदील (कार्यकारी अभियंता जयसिंगपूर विभाग) यांना (ऊर्जा शिरोमणी) पुरस्कार ,सौ मीनाक्षी अवघडे (अतिरिक्त कार्यकारी अभियंता,जयसिंगपूर विभाग) यांना (ऊर्जा रत्न)तसेच मा. श्री अंबादास अवताडे साहेब (जयसिंगपूर विभाग) यांना (ऊर्जा पुरस्कार)मिळाला आणि श्री बाबासाहेब सोळगे (शाखाधिकारी,जयसिंगपूर उत्तर शाखा जयसिंगपूर विभाग) यांना  (उत्कृष्ट शाखा अधिकारी) पुरस्कार मिळाले. श्री श्रीकांत सूर्यवंशी  (सहाय्यक लेखापाल, जयसिंगपूर विभाग) यांना उत्कृष्ट सहाय्यक लेखापाल म्हणून (ऊर्जा रत्न) पुरस्कार मिळाले तसेच श्री सोमा माने (वरिष्ठ तंत्रज्ञ शाखा कार्यालय उत्तर जयसिंगपूर विभाग) यांना (ऊर्जा भूषण) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

  सदर कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा