Breaking

शनिवार, १७ जून, २०२३

श्री व सौ रावण दांपत्याने लग्नाच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त औरवाडच्या जिल्हा परिषद शाळेस दिले लिखाणासाठी बोर्ड*


औरवाडचे ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी श्री. व सौ. रावण दांपत्य


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


नृसिंहवाडी  : औरवाड येथील प्रगतशील शेतकरी श्री कृष्णा गणू रावण व त्यांच्या पत्नी सौ विमल कृष्णा रावण यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवसानिमित्त आरवडे येथील शाळेत ग्रीन आणि व्हाईट बोर्ड देऊन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

    आज काल वाढदिवस हा इव्हेंट झाला असून सर्वच घटकांकडून वाढदिवस केक कापून पार्ट्यांच्या माध्यमातून जल्लोषात साजरा केला जात असतो. अशी सध्या परिस्थिती असताना एका ज्येष्ठ शेतकरी जोडीने आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यापेक्षा रचनात्मक कामाच्या माध्यमातून साजरा करावा असं मनस्वी त्यांना वाटले. यासाठी त्यांनी जिल्हा परिषद शाळेमधील अध्ययन व अध्यापन प्रक्रियेच्या सेवासाठी लागणाऱ्या सुविधांचे चर्चा केली. स्वतः शाळेमध्ये जाऊन चौकशी केली असता शाळेत नवीन बोर्डाची (फलकाची) आवश्यकता आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या दांपत्यानी आपल्या गावातील शाळा टिकावी व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी औरवाडचे ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी दाम्पत्याने औरवाडच्या जिल्हा परिषद शाळेत पाच वर्ग खोलीमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे पाच बोर्ड (ग्रीन आणि व्हाईट) दिले. हे सर्व बोर्ड प्रत्यक्ष खोलीमध्ये जाऊन फिटिंग करून दिले. ७३ व्या वर्षामध्ये सुद्धा श्री कृष्णा गणू रावण यांची शिक्षणाप्रती असलेली तळमळ ही उल्लेखनीय होती.यामुळे शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे आनंदित झालेले आहेत.आता विद्यार्थ्यांना नवीन बोर्डावरती  शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे.

     या रावण दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या ४५ व्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली. श्री व सौ रावण या ज्येष्ठ शेतकऱ्याने नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

   या कार्याचे विशेष कौतुक औरवाड सह परिसरामध्ये होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा