![]() |
सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश विठ्ठल पुकाळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर- अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली या संस्थेच्या महाराष्ट्र शाखेंतर्गत कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या . जयसिंगपूर येथील श्री सुरेश विठ्ठल पुकाळे यांची संत नामदेव शिंपी समाज शिरोळ तालुकाध्यक्षपदी निवड झाली. कोल्हापुरातील शाहू सभागृहात झालेल्या महासंघाच्या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नारायणरावजी पाथरकर यांच्या हस्ते श्री सुरेश विठल पुकाळे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते सुरेश विठ्ठल पुकाळे हे सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे.श्री पुकाळे यांनी विद्यार्थी दशेपासून मानवता हा केंद्रबिंदू म्हणून सेवा करण्यास प्रारंभ केला. ही सेवा आजतागायत अविरतपणे सुरू आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचं काम वाखाण्याजोगे आहे. महापूर आपत्तीच्या व कोरोना महामारीच्या काळात त्यांनी वैयक्तिक मदतीच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. वृद्धाश्रम, अनाथ आश्रम तसेच झोपडपट्टीतील गोर-गरीब व गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे. त्यांची निवड होणे हे एक प्रकारे त्यांच्या समाज कार्यास प्रेरणा देणारी घटना आहे. जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील सामाजिक कार्यास खूप खूप शुभेच्छा!
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली श्री महादेव खटावकर , श्री पांडुरंग दाभोळे , श्रीमती शशिकला उरुणकर, डॉ. अभिमन्यु खटावकर ,प्रा.डॉ. महेश काकडे, डॉ. पांडुरंग गाणबावले,श्री दिलीप गाणबावले व श्री विजय खटावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा