![]() |
पहिले नांगरट साहित्य संमेलन, कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था यांचे वतीने शिवाजी विद्यापीठात पहिले नांगरट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्याची निकड लेखकाला अस्वस्थ करणारी असली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर साहित्य राजकारणात व पत्रकारितेत ही न विचारांची पेरणी करण्याआधी मशागतींची सुरुवात काहींच्या मेंदूत वाढलेले तणकट काढण्यासाठी वैचारिक नांगरट करावे लागेल. त्यासाठीचे हे शेतकऱ्यांचे, शेतीसंबंधीचे व शेतीसाठीचे पहिले नांगरट साहित्य संमेलन रविवार दिनांक ४ जून,२०२३ रोजी संपन्न होत आहे.
तरी सर्व साहित्यक,नव साहित्यक, वाचक,विद्यार्थी व सर्व साहित्य प्रेमी घटकांनी उपस्थित राहण्याचा आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खासदार राजू शेट्टी साहेब व साहित्य संमेलनाचे निमंत्रक सुप्रसिद्ध कवी मा.संदीप जगताप यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा