Breaking

शनिवार, ३ जून, २०२३

*एनसीसीच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन*

 

*पालक मेळाव्याचे आयोजन*


*गुलाब माळी : विशेष प्रतिनिधी*


         कागल :  डी आर माने महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने आज पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आदिनाथ गाडे होते.

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॅप्टन डॉ. संतोष जेठीथोर यांनी केले.  त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आणि एनसीसी विषयीची माहिती उपस्थित पालकांना दिली. यावेळी मनोगतात महाविद्यालया विषयीची माहिती व महाविद्यालयातील इतर विभाग व एनसीसी विभाग यांचे महत्त्व पालकांना समजावून सांगितले तसेच हे महाविद्यालय या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवते त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कोणकोणते प्रयत्न करते याविषयीचा संपूर्ण आढावा प्रा. डॉ. आदिनाथ गाडे यांनी घेतला.तसेच पालकांच्या वतीने उपस्थित असणाऱ्या पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली व महाविद्यालयाला काही सूचना त्यांनी केल्या तसेच एनसीसी विभागाच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे आम्हास महाविद्यालयात येता आले याबद्दलही अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले. 

       या कार्यक्रमाचे आभार कॅडेट शर्विल घुणके यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट समीक्षा पाटील व वेदिका भोपळे यांनी केले यावेळी या कार्यक्रमास जवळजवळ वीस पालक व व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास निवृत्त प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. आबासाहेब चौगले व माजी सैनिक शिवाजीराव कदम हे उपस्थित होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला व मोठ्या प्रमाणात पालकांचा प्रतिसाद मिळाला याबद्दल सर्व पालकांचे महाविद्यालयांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा