Breaking

बुधवार, ७ जून, २०२३

सिद्धेश गोरक्ष भोसले ९९.२० टक्के गुणासह शिरोळ तालुक्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम स्थानी*


   सिद्धेश भोसले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रा. विनायक ना. रजपूत


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सिद्धेश गोरक्ष भोसले ९९.२० टक्के गुणासह शिरोळ तालुक्यात दहावीच्या परीक्षेत प्रथम स्थानी आला असून दहावीच्या परीक्षेत द जीनियस क्लासचा विद्यार्थी सर्वात जिनियस असल्याचे सिद्ध झाले.

    मुळात शिरोळ तालुका हा सर्वच पातळीवर आघाडीवर असून शैक्षणिक क्षेत्रात ही अव्वल आहे. त्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत रस्सीखेच सुरू असतो. यावेळी खासगी क्लासेस क्षेत्रातील नामांकित व अग्रेसर असलेले प्रा. विनायक नारायण रजपूत संचलित द जिनिअस क्लासेसचा विद्यार्थी अर्थात सिद्धेश गोरक्ष भोसले याने ९९.२० टक्के गुणासह शिरोळ तालुक्यात प्रथम स्थानी विराजमान झाला आहे. तसेच गणित विषयात १०० पैकी १०० गुण संपादन करून राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.

    त्याचसोबत क्लासेसच्या अन्य विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्या वर गुण संपादन केले आहेत. विनीत जाधव ९४ टक्के, समृद्धी जाधव ९४ टक्के, प्रथमेश जाधव ९३.४० टक्के, अलोक रजपूत ९३.४० टक्के, श्रेयांक समडोळे ९३.४० टक्के, शिवराज बन्ने ९२.८० टक्के, सना इंडिकर ९२.४० टक्के, विनीत कदम ९२ टक्के यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

  तसेच १२ वी आणि सीईटी परीक्षेत क्लासच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून गेल्या २२ वर्षाची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरा जोपासली आहे. योग्य,अचूक व मौलिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने या क्लासने जोपासली आहे. या क्लासचे वैशिष्टय म्हणजे गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना खास सहकार्य करून यशापर्यंत पोहोचवण्याचं काम आज तागायतपणे निस्वार्थी भावनेने पूर्ण केले आहे.

    या क्लासचे मुख्य संचालक प्रा. विनायक रजपूत यांचे उत्तम नियोजन व कुशल नेतृत्वखाली क्लासचे बलस्थान असणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे उचित मार्गदर्शन केल्याने हे यश संपादन करता आले.

    प्रा. विनायक नारायण रजपूत अर्थात 'द जीनियस क्लासच्या' यश व गुणवत्तेबद्दल पालक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा