Breaking

गुरुवार, १५ जून, २०२३

*जयसिंगपुरात भर दिवसा पूर्ववैमनस्यातून युवकावर खुनी हल्ला*


जयसिंगपूरात नांदणी नाका चौकात खुनी हल्ला

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपुरातील नांदणी नाका येथील चौकात भर दिवसा एका युवकावर पूर्व पूर्ववैमनस्यातून प्राण घातक हल्ला करण्यात आला. सदरच्या युवक हा गंभीर जखमी असून हल्लेखोरानी घटनास्थळावरून पलायन केले आहे.

       अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,अनेक दिवस धुमसत असलेल्या खाणीच्या वादातून जयसिंगपुरातील ५२ झोपडपट्टी येथे राहत असणारा युवकसुरज पवार वय वर्ष २४ हा गंभीर जखमी झाला आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

     जयसिंगपूर येथील नांदणी नाका परिसरात वडार समाजामधील विजय उर्फ पिंटू लक्ष्मण डोंगरे व लक्ष्मण कलगुटगी यांची दगडाची खाण असून त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. लक्ष्मण कलगुटगी यांच्या खाणीमध्ये दिवाणजी म्हणून काम करत असलेल्या सुरज पवार यांच्यावर विजय डोंगरे राग धरून होते.बुधवार दि.१४ रोजी दुपारी १.०० च्या सुमारास राजू बाळू गाडीवडर (पवार) हे चहा पिण्यासाठी आले होते.पिंटू डोंगरे याने तुझा मुलगा कुठं आहे, त्याला मस्ती आली आहे,त्याला सोडणार नाही अशी शिवीगाळ केली.तेवढ्यात सुरज पवार मित्रांसोबत नांदणी नाका येथे चहा पिण्यासाठी आला होता.त्यावेळी विजय उर्फ पिंटू डोंगरे,रोहित राजू डोंगरे,शेखर महादेव पाथरवट,संजू लक्ष्मण डोंगरे,सागर परशुराम पाथरवट,राहुल राजू डोंगरे,दत्ता शामराव गाडीवडर व रोहन राजू डोंगरे रा.सर्व जयसिंगपूर हे त्याठिकाणी थांबले होते.पिंटू डोंगरे याने सुरज पवार याची गाडी अडवत शिवीगाळ करत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत मारायला सुरुवात केली असता सुरजचे वडील राजू पवार हे आडवाआडवी करत असताना त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तुम्हालाही जिवंत सोडणार नाही असे म्हणत ढकलून दिले.त्यानंतर सुरजवर चाकूने पोटात,पाठीवर तसेच खुब्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.पोलिसांना माहिती समजताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले.यावेळी सुरज पवारला गंभीररीत्या जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. यावेळी बघायची प्रचंड गर्दी होती.

        शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, हेड कॉन्स्टेबल अमोल अवघडे व रोहित डावाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

    पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक रणजित पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा