Breaking

बुधवार, १४ जून, २०२३

*लग्नातील रोख आहेरला फाटा देत मंगसुळे परिवाराने जानकी वृद्धाश्रमासाठी स्कॅनर च्या माध्यमातून अनाथ, वृद्ध व अपंगांना केली विशेष मदत*


औरवाडच्या मंगसूळे परिवाराने अनोख्या पद्धतीने केला विवाह सोहळा


 *प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


 नृसिंहवाडी : औरवाड गावचे माजी उपसरपंच  मा. श्री.जयवंत शशिकांत मंगसुळे यांचा विवाह सोहळा सोमवार दिनांक १२ जून २०२३ रोजी पार पडला.या विवाह सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारचे रोख आहेर न स्वीकारता तोच आहेर जानकी वृद्धाश्रमाच्या स्कॅनर च्या माध्यमातून स्वीकारून  जानकी वृद्धाश्रमातील अनाथ, वृद्ध आणि अपंगांना ऑनलाईन पद्धतीने आर्थिक मदत करून त्यांनी अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

     आपल्याकडे परंपरेनुसार लग्न कार्यात आहेर देण्याची प्रथा आहे.याच परंपरेला फाटा देत तोच आहेर स्कॅनर च्या माध्यमातून जानकी वृद्धाश्रम घोसरवाड सेवाभावी संस्थेला ऑनलाईन पद्धतीने मदत देण्यात आली.संस्थेला आर्थिक मदत व्हावी या हेतूने लग्न मंडप सोहळ्यात दोन मोठे डिजिटल बोर्ड लावण्यात आलेले होते. आहेराच्या ऐवजी स्कॅन कोड उपलब्ध करून देण्यात आला होता.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची लोकांना खूप आकर्षण वाटले.

     या विवाह सोहळ्या प्रसंगी सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व  संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, ध्येयमंत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषवाक्याने झाले. यावेळी विवाह सोहळ्यामध्ये शिवमय वातावरण निर्माण झाले होते.

   औरवाडसह परिसरातील अनेक ग्रामस्थ, सर्व पक्षाचे नेते यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील, माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, सतीश मलमे, वैभव उगळे, अभिजीत जगदाळे, प्रतीक धनवडे सह परिसरातील प्रमुख नेते व गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते. या सर्वांनीच नवविवाहित जोडप्याला शुभ आशीर्वाद दिले.

     या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे औरवाड सह परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा