![]() |
लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर |
*सतीश भोसले(सर) : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल जयसिंगपूर मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 मध्ये समर्थ दत्तात्रय खाडे 256 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 84 व्या स्थानी,तसेच कु.त्रिशा प्रवीण कुलकर्णी 300 पैकी 252 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 103 वे स्थान पटकावले.
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2023 मध्ये कु.तनिषा उमेश प्रभू हिने 300 पैकी 246 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 40 वे स्थान आणि श्रेयस सुनील हजारे याने 300 पैकी 234 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 64 वे स्थान पटकावले.
नुकतेच महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या शाळेचा माजी विद्यार्थी श्री.अभिजीत विलास केणे यांच्या हस्ते या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सतीश भोसले, अविनाश कुंभार, सुनील हजारे, व्ही.आर.थोरात , पी डी देशमुख,ए.एस.पाटील व व्ही.एस. सौ.शिंदे मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.आय.पोवार , पर्यवेक्षिका सौ.एस.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र मालू, सदस्य श्री चंद्रकांत जाधव व श्री प्रसन्न कुंभोजकर त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा