![]() |
कार्य नियोजन बैठकीत कार्यक्रम अधिकारी यांना मार्गदर्शन करताना संचालक प्रा.डॉ.तानाजी चौगुले, प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार व प्रा. संदीप पाटील व इतर पदाधिकारी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कार्यनियोजन बैठक विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे मंगळवार दि. 24/7/2023 रोजी ग्रंथालय हॉलमध्ये खेळीमेळीत संपन्न झाली.
सदर बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाचे एन.एस.एस संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले, अध्यक्षस्थानी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार होते. जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील, जिल्हा सहसमन्वयक डॉ.आदिनाथ कांबळे उपस्थित होते.
सदर बैठकीदरम्यान संचालक डॉ.तानाजी चौगले मार्गदर्शन करताना म्हणाले, एन एस एस चा मुख्य आत्मा विद्यार्थी असून सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध सेवा कार्य करण्यास प्रेरित करावे. तसेच स्वयंसेवकाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा करीत सक्षम समाज व राष्ट्र निर्माण कार्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी G-20, Y-20 आणि W-20 या विषयावर प्रकाश टाकला. तसेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नियमित व विशेष श्रमसंस्कार शिबिरा विषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी नवीन शैक्षणिक धोरण- 2020 या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की प्रत्येक महाविद्यालयाने नवीन शैक्षणिक धोरण राबविणेच गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
सदर बैठकीमध्ये वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी चर्चा झाली. तसेच उपस्थित कार्यक्रम अधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक डॉ.चौगले यांनी प्रश्नांचं उत्तम पद्धतीने निराकरण केले. यावेळी डॉ.चौगले यांनी प्रा. संदीप पाटील यांची कोल्हापूर शहर विभागीय पदाधिकारी म्हणून निवड झाली असल्याची घोषणा केली.
कोल्हापूर जिल्हा एनएसएस समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी या कार्यक्रमातील उपस्थित घटकांचा स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉ.पाटील यांनी.सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. राजश्री पाटील व डॉ. अस्मिता तपासे चीनी केले. या बैठकीसाठी कार्यक्रम अधिकारी पी. आर. बागडे, डॉ.बी. टी. दांगर, डॉ.डी. शिंदे, डॉ. गोवर्धन उबाळे तसेच कोल्हापूर जिल्हयातील (स कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. विद्यापीठातील रा.से.योजना कक्षाचे व महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे उत्तम व सूत्रबद्ध नियोजन स्थानिक संयोजक कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
वार्षिक कार्य नियोजन बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते बंद असतानाही बहुतांशी कार्यक्रम अधिकाऱ्यांनी या कार्य नियोजन बैठकीस उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे या बैठकीत कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा