![]() |
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देताना |
डॉ.महावीर अक्कोळे, ज्येष्ठ विचारवंत, जयसिंगपूर (कोल्हापूर)
मणिपूरमधील माणुसकीला काळीमा फासणारी या देशातील सर्वाधिक क्रुर-बीभत्स घडल्यानंतर जवळपास तीन महिने सत्ताधार्यांच निर्लज्ज मौन बाळगणं,अशा शेकडो घटना घडल्याचे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी कोडगेपणाने मान्य करणं....या अतिशय लाजिरवाण्या,भयावह,चीड आणणाऱ्या क्लेशकारक..शर्मनाक परिस्थितीत माजी खासदार राजू शेट्टींनी इचलकरंजीत केलेला बाहत्तर तासांचा आत्मक्लेश -अन्नत्याग सत्याग्रह सर्वच संवेदनशील, मानवतावादी, लोकशाही मानणार्या माणसांना खूप खूप मानसिक आधार आणि बळ देणारं आहे.तीन दिवसांच्या या संताप, निषेध, शरम,क्लॆश,अशा भावनांनी भरलेल्या आणि भारलेल्या आंदोलनाचा साक्षीदार काही गोष्टी मनाला खूप भिडल्या.
पुष्पा पाटील या पत्रकारितेच्या विद्यार्थिनीचे जोशपूर्ण, ह्रदयाला भिडणारे मनोगत.
भगवान कदम या अंध असून एक उत्तम झुणका भाकर केंद्र चालवणाऱ्या चाहत्या कार्यकर्त्याने भेटून राजू शेट्टींच्या भावनेशी व्यक्त केलेली सहमती.
सामाजिक चळवळीतील अग्रणीय नेते प्राचार्य ए.बी.पाटील सरांनी विषयाची केलेली जोरदार मांडणी.
राष्ट्रसेवादलाच्या कलापथकाने आणि संवेदना टीमच्या मुलामुलींनी अत्यंत प्रभावीपणे सादर केलेले "हर घर संविधान" हे पथनाट्य. आणि
--अक्षरशः हजारो माणसांनी प्रखर निषेधाच्या दाहक-मंद प्रकाशाने उजळून निघालेला कँडल मार्च.
राजू रस्त्यावर उतरुन केलेल्या या सणसणीत निषेधाच्या सत्याग्रहामुळे माझ्यासारख्या दुर्बळांमध्ये जरा सबळतेची...जिवंतपणाची...राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण होईल असे वाटू लागले आहे हे निश्चित ! म्हणूनच चिडीचुप्प शांततेतला आश्वासक आवाज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या रूपाने!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा