Breaking

रविवार, २३ जुलै, २०२३

*इचलकरंजी मध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांचे अन्नत्याग आंदोलन*

 

इचलकरंजीत माजी खासदार राजू शेट्टी यांचे अन्न त्याग आंदोलन


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : गेल्या दोन महिन्यांपासून धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी महिलांवर अत्याचार करून नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, सर्वोच्च न्यायालय याबद्दल कारवाई करण्याची मागणी करत आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणारा भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह आज दिल्लीतील संसदेत हसत हसत दाखल झाला..!

     या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून हे सर्व पाहणे अत्यंत क्लेषदायक आहे. त्यामुळे देशातील या सर्व महिला भगिनींवरील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक , सामाजिक संवेदनशील नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

  सदरचे अन्नत्याग आंदोलन स्थळ - सोमवार दि. २४ जुलै २०२३ रोजी  महात्मा गांधी पुतळा, इचलकरंजी

    वेळ : सकाळी १०.०० वाजता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा