Breaking

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

*शिरोळ तालुक्यातील उमळवाड गावचे सुपुत्र व जयसिंगपूर कॉलेजचा माजी विद्यार्थी स्वप्निल कल्लाप्पा कांबळे यांचा इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेत महत्वपूर्ण योगदान*

 

भारताच्या यशस्वी चंद्रयान-३ मोहिमेत उमळवाडच्या स्वप्नील कांबळे चे महत्त्वाचे योगदान
 

*प्रा.डॉ. महावीर  बुरसे : उपसंपादक*


 जयसिंगपूर : गेली कित्येक दिवस आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारताची चांद्रयान-३ मोहीम सर्वांचे लक्ष वेधले होते. त्या संदर्भातील प्रत्येक गोष्टींची चर्चा सर्वत्र होताना दिसत होती. मात्र यामध्ये जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचा माजी विद्यार्थी स्वप्निल कल्लाप्पा कांबळे (उमळवाड) या गावच्या सुपुत्राचा सहभाग होता. स्वप्निल ने स्पर्धा  परीक्षेची तयारी करीत भारतामधील अंतराळ संशोधन संस्था इस्रो मधील सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथे तंत्रज्ञ पदावर रुजू होऊन यशस्वी झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेत खारीचा वाटा उचलतो याचा  सार्थ अभिमान आहे.


    टेक्निकल सायंटिस्ट स्वप्निल कांबळे हा सुरुवातीपासून सुज्ञ,अभ्यासू व प्रामाणिक विद्यार्थी होता.जयसिंगपूर कॉलेजमध्ये अकरावी आर्ट्स मध्ये प्रवेश घेऊन बी.ए. इंग्रजी विषयातून पदवी संपादन केली. स्वप्निल चे प्राथमिक शिक्षण उमळवाड मधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण झेले हायस्कूल येथे तर दहावीनंतर आयटीआय शिरोळ शासकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये पंप ऑपरेटिंग व मेकॅनिकल मध्ये पूर्ण केले. या काळात दत्त सहकारी साखर कारखान्यात काही वर्ष काम करीत  स्पर्धा परीक्षेची तयारी चालू स्वप्निल ने आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून व कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन जयसिंगपूर महाविद्यालयांमध्ये नाईट वॉचमन म्हणून सात महिने काम पाहिले व याच काळात त्याची निवड इमर्जन्सी सर्विस अंतर्गत तंत्रज्ञ म्हणून सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटा येथे झाले. आणि इथून खऱ्या अर्थाने स्वप्निलचे इस्रोच्या माध्यमातून राष्ट्रीय  सेवेची सुरुवात झाली. या केंद्रामध्ये त्याचं काम खारीचा असले तरी ते महत्वपूर्ण आहे.

    त्याच्या वाटचालीत आई,वडील, भाऊ, पत्नी व मुलगी तसेच जयसिंगपूर कॉलेजचे संस्था पदाधिकारी व सर्व सदस्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले तसेच ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी त्याची वाटचाल नेहमीच मार्गदर्शक ठरेल. चंद्रयान मोहिमेतील त्याच्या सहभागाने शिरोळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. स्वप्निल बद्दल सार्थ अभिमान असल्याबाबतची चर्चा  तालुक्यात होत आहे.

      स्वप्निलच्या या आंतरराष्ट्रीय यशस्वी कामगिरीबद्दल जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्याचं मनस्वी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा