Breaking

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

*धक्कादायक ! इचलकरंजी फाट्यावर तृतीय पंथीयाचा दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या*


मृत्युमुखी पडलेला खोतवाडीचा संतोष जावीर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : सांगली-कोल्हापूर रोड इचलकरंजी फाटा येथे तृतीय पंथीयाचा दगडाने ठेचून आणि गळा आवळून निर्घृण खून झाल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी की,  संतोष जावीर वय वर्षे अंदाजे ३० ते ३५ रा. खोतवाडी ता. हातकणंगले याचा निर्घुन खुन करण्यात आला आहे.‌खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रथम दर्शनी डोक्यात दगड घालून आणि गळा आवळुन खुन झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.‌ घटना स्थळी मोबाईल, चष्मा , मोबाईल कव्हर अशा गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. घटनास्थळी डाॅग स्काॅडला पाचारण केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदिप कोळेकर करीत आहेत. 

    सदर घटनेची वर्दी पोलिस पाटील सागर कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली. या घटनेने सदर परिसरात खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा