Breaking

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

*कॉलेजच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी अहोरात्रपणे झटणारा ध्येयवेडा माणूस डॉ. सुभाष अडदंडे : डॉ.महावीर अक्कोळे यांचे प्रतिपादन*


अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त डॉ.सुभाष अडदंडे यांचा सत्कार करताना पद्माकर पाटील, डॉ. अक्कोळे, प्राचार्य डॉ. मांजरे व अन्य मंडळी

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : सन २००४ पासून कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक विकासासाठी अहोरात्रपणे झटणारा ध्येयवेडा माणूस म्हणून डॉ. सुभाष अडदंडे यांचे उच्च कोटीचे व्यक्तिमत्व दृष्टीपथात पडते असे मत डॉ.महावीर अक्कोळे यांनी डॉ. सुभाष अडदंडे यांच्या ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात मांडले.

       अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर आणि अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्तपणे संस्थेचे कार्यशील अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांचा ७५ वा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आला होता.

      प्रारंभिक जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या ७५ वा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजनाचा हेतू स्पष्ट करीत  डॉ.अडदंडे यांच्या कार्याचा गौरव उल्लेख केला.

      सुरुवातीस प्रा.सौ.अंजना चौगुले- चावरे यांनी डॉ.अडदंडे यांच्या गौरवार्थ मानपत्राचे वाचन केले. संस्थेच्या वतीने डॉ. सुभाष अडदंडे यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. तसेच सौ.अडदंडे वहिनींना साडी  व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

    श्री व सौ अडदंडे यांचा अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनिअर कॉलेज आणि जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर च्या वतीने भेटवस्तू,शाल व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.


      डॉ.सुभाष अडदंडे यांच्या सन्मानार्थ व गौरवार्थ त्यांच्याविषयी संस्थेचे सचिव प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे यांनी त्यांच्या कार्याचा वास्तववादी व विस्तृत उल्लेख करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे सदस्य प्रा. अप्पासाहेब भगाटे यांनी डॉ.अडदंडे यांच्या विविध शैक्षणिक व विद्यार्थी केंद्रित विकासात्मक व कर्तृत्वपूर्ण कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या वतीने त्यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या. डॉ. टी.जी.घाटगे, डॉ.सौ.एस.एस.शेळके,उपप्राचार्य प्रा.भरत आलदर,डॉ. प्रभाकर माने यांनी त्यांच्या बहुश्रुत व्यक्तिमत्त्वाचा उलगडा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी अनेकांत स्कूलच्या वतीने सौ.पाटील व श्री.पाटील यांनी आपला अनुभव व शुभेच्छात्मक शुभ संदेश भाषणातून व्यक्त केल्या.


      ७५ वा अमृत महोत्सवी सत्काराला उत्तर देत असताना   डॉ.सुभाष अडदंडे हे भावना विवश झाले होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना अलगदपणे डॉ.अडदंडे यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी या संस्थेत सदस्य म्हणून पद स्वीकारल्यापासून ते आजतागायत अखंडितपणे कॉलेजचा शैक्षणिक व भौतिक विकासासाठी प्रयत्न करताना आलेल्या गोड व कटू अनुभवांचं कथन केले. कॉलेजच्या चौफेर प्रगतीसाठी त्यांना अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे मिळालेल्या पाठबळाचा उल्लेख केला. त्याचबरोबर कालवश  स्वातंत्र्य सेनानी पी.बी.पाटील,  स्वातंत्र्य सेनानी ल.क.अकीवाटे, डॉ.एस के पाटील, प्रमिलाताई पाटील, माजी प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे व एडवोकेट बाबुराव अडदंडे त्याचबरोबर माजी खासदार मा.राजू शेट्टी यांनी केलेलं सहकार्याचा उल्लेख ही याप्रसंगी केले.अनेकांत परिवारातील सर्व सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याला तडा न देता या कॉलेजच्या विकासासाठी शेवटपर्यंत कटिबद्ध राहणार असल्याचे ही याप्रसंगी ते बोलले.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्यशील व्यक्तिमत्व मा.पद्माकर पाटील अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, जयसिंगपूर कॉलेज कॅम्पसचा जो शैक्षणिक व भौतिक चेहरा-मोहरा बदलण्यामध्ये डॉ.अडदंडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाला आमची साथ नेहमीच असणार आहे. याप्रसंगी त्यांनी सौ.अडदंडे वहिनींनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष डॉ.अडदंडे यांनी दिलेल्या मोलाच्या साथीचे कौतुक केले.

     या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सौ. मुचंडीकर मॅडमनी केले.तर उत्तम सूत्रसंचालन प्रा. सुनील चौगुले यांनी केले.

     डॉ.अडदंडे यांच्यावर प्रेम करणारे व उपस्थित असणाऱ्या सर्व घटकांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मा. मादनाईक सावकार ,मा.सुभाष शेट्टी, अशोक कोळेकर, पराग पाटील, शैलेश आडके, शैलेश चौगुले, डॉ. सुरेश पाटील, संजय मालू, अशोक शिरगुप्पे, प्रा.के.बी.पाटील, प्रा.पी.सी.पाटील, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य सौ. प्रिया गारोळे व समाजातील प्रतिष्ठित घटक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे डॉ.अडदंडे यांचे ज्येष्ठ गुरु प्रा. केतकर व त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे सर्व मित्र परिवार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन संस्थेचे सर्व सन्माननीय घटक, प्राचार्य डॉ.मांजरे, प्रा.अभिजीत अडदंडे, संजय चावरे, हांजे सर व अन्य घटकांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा