![]() |
कर्तुत्वान व्यक्तींचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : माजी राज्यमंत्री मा.विजय दादा चौगुले संस्थापक अध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा यांच्या प्रेरणेने 'मी वडार महाराष्ट्राचा' विद्यार्थी गौरव समितीच्या वतीने वडार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा आणि दहावी- बारावी बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष मा.अर्जुन देशमुख, तालुकाध्यक्ष मा.सुरेश शिंगाडे व मा. गंगाराम माने यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
या गुण गौरव समितीचे अध्यक्ष सचिन भोसले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना म्हणाले, समाजातील गुणवंत विद्यार्थी व गुणवान-कर्तुत्वान समाज बांधवांचा गौरवरुपी सन्मान करून पुढील कार्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा उदात्त हेतू आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सचिन डोंगरे व माजी नगरसेवक महेश कलकुटगी यांनी विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअर व मार्गदर्शन या विषयावर कु. प्रत्यूशी डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल व नवचैतन्य निर्माण करणारे मार्गदर्शन केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार्य करण्यात आला. यामध्ये माजी नगरसेवक गुंडाप्पा पोवार, अशोक भोसले, सचिन गाडीवडर (यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार), वसंत पवार (यशस्वी सेंट्रींग व्यावसायिक), धनाजी जाधव (यशस्वी बांधकाम कॉन्टॅक्टर), सतीश माने (एसटी महामंडळ रिटायर्ड), डॉ.सौ.आशा गाडीवडर (महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन गोवा पुरस्कार प्राप्त) व सौ.भारती माने (यशस्वी हॉटेल व्यवसायिका) या मान्यवरांचा गौरव सोहळा संपन्न झाला.
कु. ममता नलवडे (टोप) ९३ टक्के आणि उदयराज शिंदे (९९ टक्के) या दोघांनी दहावी बोर्ड परीक्षेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याचवेळी मा.नितीन साळुंखे शहराध्यक्ष व अविनाश कलकुटगी शहर संघटक,वंचित बहुजन आघाडी यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत गुणवंत व यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मा.सचिन डोंगरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माजी नगरसेवक महेश कलकुटगी, उद्योजक संतोष भोसले, अमर पोवार, महेश भोसले , वसंत पवार, बाबुराव नलवडे, संजय कलकुटगी,प्रतिष्ठित नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.
सचिन मनोहर भोसले यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार उद्योजक संतोष भोसले यांनी दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची पुढील शैक्षणिक कार्यासाठी मदत करून दातृत्वाचे घडविले.
या सोहळ्याचे उत्तम नियोजन सचिन भोसले, सुरेश शिंगाडे व त्यांच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केले.
Very good 👍
उत्तर द्याहटवा