Breaking

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

*हातकणंगले-रामलिंग रोडवर भीषण अपघात ; दोन महिला व बालक गंभीर जखमी*


हातकणंगले - रामलिंग रोडवर भीषण अपघात


*स्वाती शिंदे : विशेष प्रतिनिधी*


हातकणंगले : हातकणंगले व रामलिंग रोडवरील झालेल्या भीषण अपघातात महिला व बालक गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 

    अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार श्रावण सोमवारच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असल्याने एसटी बस व रिक्षाचा अपघात झाला. सदर अपघातात दोन महिला व लहान बालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती समजताच घटनास्थळी हातकणंगले पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे. मात्र रात्री उशिरा दोन महिला व एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा