Breaking

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

*भारतीय लोकसंख्येची गुणवत्ता ही राजकीय धोरणे, शैक्षणिकता व उपलब्ध संधी यावर अवलंबून : प्रा.डॉ. महावीर बुरसे यांचे प्रतिपादन*


व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना डॉ. महावीर बुरसे, सोबत उपप्राचार्य डॉ. एन.पी.सावंत,डॉ. प्रभाकर माने व प्रा. कु. माधुरी कोळी


*प्रा. माधुरी कोळी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : भारतीय लोकसंख्येची गुणवत्ता ही राजकीय धोरणे, प्राप्त परिस्थिती, शैक्षणिक उपलब्धता व उपलब्ध संधी यावर अवलंबून. असल्याबाबतचं मत पर्यवेक्षक प्रा.डॉ. महावीर बुरसे  यांनी प्रतिपादन केले.ते जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एन.पी. सावंत होते.

     सुरुवातीस प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून व्याख्यान आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय भोलू शर्मा यांनी केले.


      "भारताच्या लोकसंख्येची सद्यस्थिती व गुणवत्ता" या विषयावर यथोचित मार्गदर्शन करताना डॉ. महावीर बुरसे म्हणाले, जागतिक लोकसंख्येच्या क्रमवार यादीत भारतीय लोकसंख्येचा आकार प्रथम स्थानी आहे. मात्र उपलब्ध असलेल्या लोकसंख्येचा अर्थात मानव साधनसंपत्तीचा पर्यंत वापर करणे योग्य असते. परंतु राजकीय धोरणे, शिक्षणावरील सरकारचा खर्च, प्राप्त परिस्थिती या सर्व गोष्टींच्या अभावामुळे लोकसंख्येच्या गुणवत्तेची घसरण होत आहे. भारतीय लोक सध्या लोकसंख्येबाबत जागरूक होत असून लोकसंख्येचा आकार कमी होताना दिसत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता देशातील सर्व साधन संपत्तीवर अतिरिक्त ताण पडताना दिसत आहे. याबाबत त्यांनी वास्तविक उदाहरण दिले.

        अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत म्हणाले, लोकसंख्येची भयावह  परिस्थिती ही आपण स्वतःहून निर्माण केली आहे. यासाठी लोकसंख्येच्या गुणवत्तेकडे पहात असताना शिक्षण व किमान कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. पाठ्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंख्येची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

      प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते.या कार्यक्रमाचे उत्तम आभार प्रसाद कांबळे या बी. ए. भाग १ च्या विद्यार्थ्यांने मानले.  उत्तम सूत्रसंचालन सूत्रसंचालिका प्रा. माधुरी कोळी यांनी केले. कु.तन्वी खोत हिचे विषय सहकार्य लाभले.

       याप्रसंगी प्रा.डॉ. प्रभाकर माने अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.सौ. कविता चानकने व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा