Breaking

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

*सहकारभूषण एस. के. पाटील कॉलेजच्या साक्षी कागले ने जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत मिळवले रौप्य पदक*

 

यशस्वी विद्यार्थिनी कु.साक्षी रमेश कागले, मजरेवाडी


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


कुरुंदवाड : सहकारभूषण एस.के.पाटील कॉलेज कुरुंदवाड या महाविद्यालयाची अकरावी वाणिज्य या शाखेतील विद्यार्थिनी  कु. साक्षी उमेश कागले हिने कोल्हापूर जिल्हास्तरीय मुष्टीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवून आपल्या कॉलेजचे नाव चमकवले.

    कु.साक्षी ही लहानपणापासून  मुष्टीयुद्ध म्हणजे बॉक्सिंगची आवड होती, केंद्र शाळा मजरेवाडी येथे इयत्ता पाचवी ला असताना 2017 यावर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदवला. पहिल्याच प्रयत्नात तिने रौप्य पदक मिळवले त्यानंतर इयत्ता आठवी, दहावीला असताना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.या सर्वच स्पर्धेमध्ये तीन रौप्य व दोन सुवर्ण पदके मिळवून  आपल्या कुटुंबीयांसह आपल्या गावचे नाव उज्वल केले.

     साक्षीचे वडील हे शेतमजूर आहेत.आपल्या घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा या खेळाच्या तयारीत तिला कुठेही कमी पडू दिले नाहीत. प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून सुद्धा आपल्या मुलीची शिक्षण व तिचा खेळ आणि आपल्या कुटुंबाचा  योग्य समन्वय साधला.यामुळेच साक्षी या विविध स्पर्धांमध्ये अनेक पदके तिने मिळवली.

    जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना तिने आपले स्वप्न सांगितले बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून आपल्या देशाचे नाव उज्वल करायचे आहे. असा ठाम विश्वास तिने व्यक्त केला

   या यशासाठी तिला तिची आई, वडील, हकार भूषण एस के पाटील मधील शिक्षक या सर्वांचे विशेष  सहकार्य लाभले.मार्गदर्शक सचिन देवल कोरे,शिरढोण यांचे सहकार्य लाभले.

  तिच्या या स्पर्धेतील यशाचे मजरेवाडी कुरुंदवाड सह परिसरामध्ये विशेष कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा