![]() |
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निकाल जाहीर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : दिनांक २ सप्टेंबर, २०२३ रोजी विद्यापीठ कार्यालयात विद्यापरिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली तर डॉ. पी. एस. पाटील, मा. प्र-कुलगुरू हे उपस्थित होते. डॉ. व्ही. एन. शिंदे, मा. कुलसचिव यांनी बैठकीचे सदस्य सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सदर बैठकीमध्ये व्यवस्थापन परिषदेवरील दोन (एक शिक्षक व एक महिला ) जागांच्या निवडणूकीसाठी व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर एक विद्यापीठ प्रतिनिधी निवडूण देणेसाठी मतदान झाले. सदर निवडणूकाचा निकाल खालील प्रमाणे :
व्यवस्थापन परिषदेवर शिक्षक गटातून डॉ. सपकाळे जगदिश भागवत यांना २६ मते तर डॉ. चव्हाण सुनील दत्तात्रय यांना १६ मते पडली. यामध्ये डॉ. सपकाळे जगदिश भागवत निवडून आले.
व्यवस्थापन परिषदेवर महिला गटातून डॉ. श्रीमती मैंदर्गी वर्षा विवेकानंद यांना २९ मते तर डॉ. श्रीमती संकपाळ रूपाली उत्तम यांना १२ मते पडली तर १ मत बाद झाले. यामध्ये डॉ.श्रीमती मैंदर्गी वर्षा विवेकानंद निवडून आल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळावर एक विद्यापरिषद सदस्य निवडून देण्यासाठी झालेल्या निवडणूकीच्या मतदानामध्ये प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांना २७ मते तर श्रीमती संकपाळ रूपाली उत्तम यांना १५ मते पडली. यामध्ये प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव हे निवडून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा