![]() |
गणपती महाआरतीचा मान आर्यन उर्फ अनुराधा कांबळे यांना |
*विजय कांबळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : दिनबंधू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज महाआरतीचा मान आर्यन उर्फ अनुराधा कांबळे या तृतीयपंथी व्यक्तीला देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
मंडळाच्या वतीने सातत्याने दरवर्षी गणेशोत्सव काळात सामाजिक बांधिलकी व जबाबदारी पार पाडण्याचं काम केलं जात असते.यावर्षीही अशाच प्रकारची जबाबदारी पार पाडताना एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग त्यांनी केला. यावर्षीचा गणेशोत्सव आरतीचा मान एका तृतीयपंथी व्यक्तीला देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार भारतीय संविधान ने दिले असतानाही समाजाकडून तृतीयपंथीयांचा पदोपदी विविध प्रकारे अपमान व अवेहलना केली जात असते.याला छेद देण्यासाठी मंडळाकडून आयर्न उर्फ अनुराधा कांबळे यांना गणपती आरतीचा मान दिला.
याप्रसंगी अनुराधा म्हणाले की, आम्ही पण सर्वसामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगतो समाजातील प्रत्येक घटकाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. आमच्या मधील ही काही मंडळी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच आपलं क्षेत्र यशस्वीपणे सांभाळत आहेत. याप्रसंगी एक उपदेश पर संदेश देत म्हणाल्या, माणूसकीच्या शिक्षणात तुम्ही सर्वजण पास व्हावे ही अपेक्षा आहे. दिलेल्या या सन्मानाबद्दल त्यांनी मंडळाचे मनापासून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी मंडळाचे सर्व सभासद, युवक-युवती, जेष्ठ महिला व पुरुष उपस्थित होते. मंडळाच्या या आगळ्यावेगळ्या विशेष उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशस्वी नियोजनामध्ये श्री. राहुल घाटगे सरांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा