![]() |
बुबनाळच्या सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीने सलग पंधरा वर्षे रक्तदान शिबिर |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
बुबनाळ : येथील श्री सिद्धिविनायक सामाजिक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत प्रत्येक वर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.या उत्सवाच्या मार्फत एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करतात.
यावर्षी शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 या दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
फक्त रक्तदान शिबिर घेऊन न थांबता या मंडळाची मुले गरजू लोकांना रक्त पुरवठा करतात. चालू वर्षात 42 लोकांना त्यांनी रक्तपुरवठा आपल्या मंडळामार्फत केला आहे.महापुर,कोरोना काळ व असंख्य संकटात सुद्धा ही संस्था नेहमीच अग्रेसर असते.
यावर्षी चे रक्तदान शिबिर हे मिरज येथील वसंत दादा रक्तपेढीमार्फत आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी रक्तदात्यांना भेट रूपामध्ये भेटवस्तू देण्यात आले.
या मंडळामार्फत सामाजिक देखावा सुद्धा उभारण्यात आला आहे.देशात वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ही वृक्षतोडी थांबावी व जंगल अबाधित राहावे. वृक्ष संवर्धन व्हावे असा देखावा उभारण्यात आलेला आहे. या मंडळामार्फत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच मदत केली जाते.
या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष अनिल राजमाने, उपाध्यक्ष कुमार चव्हाण, मंडळाचे कार्यकर्ते विजय शहापुरे, निलेश राजमाने, लक्ष्मण राजमाने, महादेव शहापुरे, अमोल राजमाने, रमेश राजमाने यांचे विशेष सहकार्य लाभले.
सिद्धिविनायक सामाजिक सेवाभावी संस्था बुबनाळ चा कार्याचे बुबनाळ सह परिसरामध्ये विशेष कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा