![]() |
जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियानात श्रमदान करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या विचारांना व कृतीला उजाळा देण्यासाठी अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘एक तारीख, एक घंटा’ हा स्वच्छता अभियान उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उदगाव-अंकली कृष्णा नदी घाट परिसर व सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील कृष्णा- वारणा संगम घाटावरील परिसर स्वच्छ करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी उत्साहात व स्वच्छने स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. प्रारंभी विद्यार्थी उदगाव-अंकली व जयसिंगपूर कृष्णा नदी घाट परिसरात विसर्जित केलेल्या मूर्तींना एकत्रित करून व्यवस्थित जागी ठेवण्यात आल्या. त्याचबरोबर परिसरात इतरत्र पसरलेले निर्माल्य व प्लास्टिक संकलित करून निर्माल्य कुंडीत टाकण्यात आले. जवळपास या ठिकाणी दीड तास विद्यार्थ्यांनी श्रमदान केले आहे.
त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्या लगत असणाऱ्या हरिपूर येथील कृष्णा- वारणा घाटावर जाऊन त्या परिसरातील प्लास्टिक व निर्माल्य गोळा करण्याचं काम विद्यार्थ्यांनी मनोभावे केले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत : सुंदर भारत' व 'नॉट मी , बट यु'या घोषणेने परिसर दुमदुमुन सोडला.
‘एक तारीख, एक घंटा’ या स्वच्छता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे कु.श्रेया संकपाळ, प्रथमेश कोळी, कु.अंकिता मादनाईक, कु.गौरी सावंत,कु.वर्षा संभुशेटे, कु.निशा सावळवाडे ,शुभम कोरे, कु.जरीना खान, कु.प्रीती कुरणे व अन्य विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने व प्रा.डॉ.के.डी. खळदकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून हा उपक्रम उत्तम पद्धतीने राबविला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा