Breaking

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

*विद्यार्थ्यांच्या आवाजाचा प्रतिध्वनी शिक्षकांच्या मनात उमटला पाहिजे : डॉ.ज्ञानेश्वर मुळे


डॉ. ज्ञानेश्वर मुळे , सदस्य मानव अधिकार, न्यू दिल्ली, प्रा. डॉ. पी.एस.पाटणकर, डॉ. वि.सं.खंडागळे, इनोवेशन मॅनेजर डॉ. जी.एस.जोशी व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि इंग्लिश मिडियम स्कुल, असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने EDUREFORM प्रकल्पातंर्गत माध्यमिक शिक्षकांसाठी नावीन्यपूर्ण अध्यापन पध्दतींचे प्रशिक्षण दि.25.09.2023 ते 27.09.2023 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. EDUREFORM हा युरोपिअन युनियन चे अर्थसहाय्य असलेला प्रकल्प शिक्षणशास्त्र विभागात सुरू आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीचे भारतीय शिक्षण पध्दतीवर होणारा परिणाम अभ्यासणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे. सबंधित कार्यक्रमात 10 नावीन्यपूर्ण अध्यापन पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सदस्य मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले होते.

   डॉ. ज्ञानेश्वर मुळे मार्गदर्शन करताना म्हणाले, त्यांनी शिक्षकी पेशा हे पवित्र काम आहे व विद्यार्थ्यामध्ये आपुलकीची भावना शिक्षकांनी पसरवली पाहिजे असे मत मांडले. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रतिध्वनी शिक्षकांच्या मनात उमटला पाहिजे तरच शिक्षण अर्थपूर्ण होईल, असे मत त्यांनी मांडले. 

    या प्रशिक्षणासाठी अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. पी.एस.पाटणकर, डॉ. वि.सं.खंडागळे, इनोवेशन मॅनेजर डॉ. जी.एस.जोशी व अधिविभागातील शिक्षक आणि इंग्लिश टिचर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. नितीन नायकवडे व महेश पोळ तसेच सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा