Breaking

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजचे सुयश ; जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तृतीय स्थान*


युथ फेस्टिवल मध्ये लोकनृत्याचा आविष्कार करताना जयसिंगपूर कॉलेजचे विद्यार्थी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित ४३ वा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव (२०२३ २०२४) रविवार दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी संयोजक कॉलेज सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

     जिल्हास्तरीय या युवा महोत्सवामध्ये अनेक वैयक्तिक व सामूहिक कलाप्रकार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील लोकनृत्य या कला प्रकारात व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत  जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.  लोकनृत्य कला प्रकारात कोल्हापूर जिल्ह्यातील १३ महाविद्यालयीन संघ सहभागी होते. जयसिंगपूर कॉलेजच्या कलाकारानी अत्यंत उत्तम पद्धतीने लोकनृत्याचा आविष्कार करून तृतीय स्थान मिळवले.

     तसेच इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत ३१  स्पर्धक सहभागी होते. यामध्ये जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कु.प्रेरणा भाट हिने उत्तम सादरीकरण,अस्खलित इंग्रजी वक्तृत्व व प्रभावी मांडणीच्या माध्यमातून तृतीय स्थान मिळवले.

     जयसिंगपूर कॉलेजने मिळवलेल्या या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे व खजिनदार पद्माकर पाटील व संस्थेचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांच्या उत्तम मार्गदर्शन व नेतृत्वाखाली  सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख डॉ.सौ. विजयमाला चौगुले व सांस्कृतिक मंडळातील डॉ. सुपर्णा संसुध्दी, प्रा. सुजाता पाटील,डॉ. संदीप तापकीर, प्रा.प्रितम पाटील व इतर सर्व सदस्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली.

      युथ फेस्टिवल मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा