Breaking

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

*महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालका पदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती*

 

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक पदी रश्मा शुक्ला यांची नियुक्ती


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी ( डीजीपी महाराष्ट्र) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश सेठ डिसेंबरमध्ये निवृत्त होणार होते, परंतु त्यांनी आधीच व्हीआरएस घेऊन नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी त्यांची MPSC चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

    रजनीश सेठ यांच्या जागी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत.

      देशाच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकारचे योजना केंद्र व राज्य शासनाकडून आखल्या जात असून त्याचा निश्चित फायदा देशातील महिलांना होत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करून महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

      महिला पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रथमच कायदा व सुव्यवस्थेचा अनुभव प्रत्ययास येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा