![]() |
कोल्हापूर सीपीआर रुग्णालयाचे डॉ. पाटील मार्गदर्शन करताना यावेळी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, कार्यक्रम अधिकारी डॉ.खळदकर, कु.क्रांती शिंदे व सौ.चारुशिला कणसे मॅडम |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष (जिल्हा शलचिकित्सक) सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त कोल्हापूर जिल्हा हे अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी डॉ.निलेश पाटील व अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांनी सुचित केल्याप्रमाणे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत आहे.
प्रारंभी डॉ. खंडेराव खळदकर यांनी उपस्थित घटकांचे स्वागत करून प्रास्ताविकाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा तंबाखूमुक्त अभियान राबवण्यासाठी व प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी युवकांच्या माध्यमातून हे अभियान सक्षम करण्याचा हेतू असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूरचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, "आता फक्त एकच नारा, तंबाखूमुक्त कोल्हापूर सारा" या घोषवाक्य प्रमाणे अभियान राबविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सीपीआर हॉस्पिटलचे जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष सक्षम आहे.
डॉ.निलेश पाटील मार्गदर्शन करताना तंबाखू सेवनाचे विविध प्रकार, भारतामध्ये तंबाखूचा वापर, यामध्ये १४ कोटी पुरुष व ४ कोटी महिला तंबाखूचे नियमित सेवन करतात. सर्वसाधारणपणे भारतात वर्षभरामध्ये ४०३०० लाख किलो तंबाखूचे सेवन केलं जातं. हे अत्यंत धक्कादायक असून याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ते पुढे म्हणाले तंबाखू आणि कॅन्सर याचा समीकरण बनले असून ४०% कॅन्सर हा तंबाखू सेवनामुळे होतो हे आता निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर तंबाखू सेवनामुळे अल्प कालावधीतील शरीरावरील परिणाम आता प्रकर्षाने जाणवत आहेत. यामध्ये केसांना दुर्गंधी, तोंडाला दुर्गंधी, दातांच्या समस्या, वास घेण्याची क्षमता कमकुवत होणे अकाली वृद्धत्व येणे,चेहऱ्यावरील सुरकुत्या पडणे व रोग प्रतिकार शक्ती कमी होणे. तसेच परिणाम स्वरूप हाडे ठिसूळ बनणे अशा भयानक दुष्परिणामाला सामोरे जावे लागत आहे. तसेच परिणाम स्वरूप तंबाखू सेवनाच्या दीर्घ कालावधीमध्ये दमा, क्षयरोग,लकवा, मोतीबिंदू, मधुमेह, हृदयरोग, गॅगरीन, नपुसंकता व गर्भपात अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या रोगांना शरीर बळी पडत आहे. यामुळे वेळीच तंबाखू व्यसनापासून दूर राहणं ही काळाची गरज असून उत्तम आरोग्यासाठी तंबाखू सेवनापासून दूर राहणं हा अंतिम मार्ग आहे.
डॉ. पाटील यांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 (COTPA) याविषयी सखोल माहिती दिली. तसेच त्यांनी तंबाखू सोडण्याचे विविध मार्ग उपाय सांगितले.
डॉ.पाटील यांनी तंबाखूमुक्त राहण्यामुळे जीवनमानात होणारे बदल याची चर्चा केली.जीवनमानात सुधारणा, आरोग्यवृद्धी, शरीरक्षमता वृद्धी, आत्मविश्वास वाढतो, पैशाची बचत, वृद्धत्वाच्या लक्षणांमध्ये कमी व यामुळे वैयक्तिक स्वास्थ्याबरोबर कौटुंबिक लाभ होतो.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूरचा "तंबाखूमुक्त कोल्हापूर जिल्हा" हे अभियान खऱ्या अर्थाने आनंदी व आरोग्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी एक नामी संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी कॉलेजच्या युवकांच्या मध्ये प्रबोधन करून त्यांच्या माध्यमातून समाजात व जन माणसात जनजागृती करता येते. यानिमित्ताने सर्वांनी तंबाखूमुक्त कोल्हापूर सारा हे अभियान यशस्वीपणे राबवणे गरजेचे आहे.
सरते शेवटी डॉ. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी सर्व घटकांना तंबाखू मुक्तीसाठी शपथ दिली. यावेळी सीपीआर चे कु.क्रांती शिंदे, सौ.चारुशिला कणसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले. आभार प्रा. सुरज चौगुले यांनी मानले. या कार्यक्रमाचे नेटके व उत्तम नियोजन प्रा.कु.माधुरी कोळी, प्रा.सौ.विश्रांती माने, प्रा.एम.एस.बागवान ,भोलू शर्मा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.
सदर कार्यक्रमास कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा