![]() |
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटक डॉ. धवलकुमार पाटी, बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अतिक पटेल, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, क्रीडा समन्वयक डॉ. महादेव सूर्यवंशी व इतर मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये 'कोल्हापूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धांचे' नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.या स्पर्धेचे उदघाटन २७ आक्टोंबर २०२३ रोजी स्थानिक समितीचे सदस्य मा. डॉ. धवलकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व स्पर्धा समन्वयक डॉ.एम.एस. सूर्यवंशी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतंगत येणा-या २३ महाविद्यालयांचे ९० खेळाडू सहभागी झाले होते.
प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. धवल पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती जपायला हवी मेजर ध्यानचंद यांच्या प्रमाणे खेळाच्या मैदानाबरोबर जीवनाच्या पिचवरही आपण प्रयत्न, चिकाटी व सातत्य या त्रिसुत्रीच्या आधारे यशस्वी होणे गरजेचे आहे.
या स्पर्धांसाठी असणाऱ्या सर्व प्राध्यापक व मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धा आयोजनाचा आणि स्पर्धेविषयची माहिती प्रा. डॉ. महादेव सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.यावेळी कार्यक्रम स्थानी कोल्हापूर विभागीय सचिव प्रा. सुहास बाब , प्रा. विजय रोकडे, प्रा. डॉ. नाईकनवरे प्रा. डॉ. विक्रम पाटील प्रा. डॉ. राजेंद्र रायकर उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर परिक्षेत्रातील एकूण ५० मुले आणि ४० मुली असे एकूण ९० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पुरुष गटामध्ये डी. आर. के. कॉमर्स कॉलेज कोल्हापूर प्रथम क्रमांक, के. आय.टी. इंजि. कॉलेज, कोल्हापूर द्वितीय क्रमांक, डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज कोल्हापूर तृतीय स्थानी, शिवाजी विद्यापीठ U. G. &P.G विभाग कोल्हापूर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे.
मुलींच्या स्पर्धेमध्ये के. आय. टी. इंजि. कॉलेज, कोल्हापूर प्रथम स्थान पटकावले, डी. वाय. पाटील इंजि. कॉलेज कोल्हापूर द्वितीय क्रमांक, महावीर कॉलेज, कोल्हापूर तृतीय क्रमांक, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे. वरील आठही संघाची इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून श्री. राकेश गायकवाड, श्री. आदित्य जाधव व श्री. शुभंम बुगाडे कोल्हापूर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे मा. डॉ. अतिक पटेल व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात स्पर्धेच्या ठिकाणी पार पडला. या प्रसंगी प्रा. रतन नाईकनवरे , प्रा. विजय रोकडे, विभागीय सचिव प्रा. सुहास वाघ, प्रा.अमर कुलकर्णी, कार्यलयीन कर्मचारी श्री. रघुनाथ माने व श्री. दिंडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. अमर कुलकर्णी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा