Breaking

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

*रक्तदान शिबिर म्हणजे तरुणांना रक्तदान करण्यासाठी नवचैतन्य निर्माण करणारा एक रचनात्मक ऊर्जावान उपक्रम : प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे*


उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.महावीर अक्कोळे , प्र.प्राचार्य प्रा.डॉ. सौ.एम. व्ही. काळे व बंडू उरूनकर, खंडेराव हेरवाडे 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये हीरक महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS), नॅशनल कॅडेट कॉर्पस(NCC) व वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी डॉ.सौ.एम. व्ही. काळे उपस्थित होते. यावेळी बंडू उरुणकर व खंडेराव हेरवाडे ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

     उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, जयसिंगपूर कॉलेजच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक व रचनात्मक उपक्रम राबवले जात असतात. या असंख्य उपक्रमापैकी रक्तदान शिबिराचे आयोजन म्हणजे विकासात्मक व रचनात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम होय.ते पुढे म्हणाले, रक्तदान शिबिर म्हणजे तरुणांना रक्तदान करण्यासाठी नवचैतन्य निर्माण करणारा एक रचनात्मक ऊर्जावान उपक्रम होय.

    सदर रक्तदान शिबिरामध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ५७ रक्तदात्यांनी स्वच्छने रक्तदान करून राष्ट्रीय सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये विशेष करून कॉलेजमधील प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी आपला सहभाग नोंदविला.

       या शिबिरासाठी प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.

       या शिबिर आयोजना मध्ये उप प्राचार्य डॉ.एन.एल.कदम, डॉ.एन.पी.सावंत, प्रा.भारत आलदर , प्रा.बी. ए.पाटील,पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, कार्यालयीन अधीक्षक श्री. ए.बी.कांबळे, श्री.संजय चावरे,वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे मा.गवळी व मा.लोंढे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आयोजक एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा.सुशांत पाटील , कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने व भोलू शर्मा यांचा महत्त्वाचा वाटा होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा