Breaking

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

योद्धांच्या स्मृतीना उजाळा व अभिवादन करण्यासाठी तसेच देशाच्या समृद्ध वारसा जतन करण्यासाठी हे अभियान उच्चकोटीचे : कुलगुरु प्रो. डॉ.दिगंबर शिर्के यांचे प्रतिपादन*


मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. दिगंबर शिर्के यांचेकडे सुपूर्द करताना, शेजारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, संचालक तानाजी चौगले व डॉ.संजय पाटील


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने आयोजित मातीरुपी अमृत कलशाचे हस्तांतरण कार्यक्रम शिवाजी विद्यापीठात संपन्न झाला. "याप्रसंगी योद्धांच्या स्मृतीना उजाळा व अभिवादन करण्यासाठी तसेच देशाच्या समृद्ध वारसा जतन करण्यासाठी हे अभियान उच्चकोटीचे असल्याबाबत मत मा.कुलगुरु प्रा डॉ.दिगंबर शिर्के यांनी प्रतिपादन केले." तसेच याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व कॉलेजच्या उपक्रमा बाबत विशेष कौतुक केले.

     कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून आलेले अमृत कलश विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी. टी.शिर्के यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले.यावेळी कुलसचिव प्रा.डॉ.विलास शिंदे व रासेयो,संचालक डॉ.तानाजी चौगले उपस्थित होते.


     स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर, २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांतील कार्यक्रम अधिकाऱ्यानी मनोभावे भावनेने विविध गावातून 'मेरी माटी मेरा देश' या राष्ट्रीय उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजच्या अमृत कलाशा मध्ये माती गोळा केली होती. सदर अमृत कलश राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने जारी केलेला आदेशानुसार त्या त्या तालुकाच्या मुख्य कॉलेजकडे तसेच  मुख्य कॉलेजकरवी शिवाजी विद्यापीठाकडे सन्मानूर्वक सुपूर्द करण्यात आले.


        आजच्या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे भर उन्हात मा.कुलगुरू प्रा.डॉ.शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अमृत कलश हातात घेऊन विद्यापीठ परिसरात  सन्मानपूर्वक फेरी काढण्यात आली. या फेरीत कुलसचिव डॉ.विलास शिंदे, संचालक तानाजी चौगले, कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील,रसेयो पदाधिकारी व कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने सक्रियपणे सहभागी झाले होते. या सन्मानपूर्वक रॅलीत शिवाजी विद्यापीठ व मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचा जयघोष करण्यात आला. सरते शेवटी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर या सन्मान रॅलीचा सांगता झाली.

      शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने अत्यंत उत्तम व सुंदर पद्धतीने नियोजन करून अमृत कलश संकलित केले.

        

*मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम नेमका काय आहे?*

     स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक ९ ऑगस्ट पासून सुरु झाला असून या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात ‘माझी माती-माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

   लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिनांक ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

     २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे असे या उपक्रमातून निदर्शनात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा