![]() |
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराच्या घटक महाविद्यालयाच्या वतीने शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी "New Dimensions and Innovations In Social Sciences" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद महाविद्यालयाच्याच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सामाजिक शास्त्रे विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व नुकत्याच स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे कुलगुरू प्रोफेसर (डॉ.) डी. टी. शिर्के साहेब यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलाधिकारी मा. चंद्रकांत दळवी साहेब ( रिटायर्ड आयएएस ऑफिसर) असणार आहेत. तर प्रमुख उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री. विकास देशमुख साहेब ( रिटायर्ड आयएएस ऑफिसर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब हे मान्यवर असणार आहेत. गुजरात आयआयटी मधील प्रोफेसर डॉ. प्रवीण जाधव यांच्या बीज भाषणाने परिषदेला प्रारंभ होणार आहे.
सदर परिषदेकरिता विविध देशांतील संशोधकांकडून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोलशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, मीडिया आणि इंटरटेनमेंट यांसारख्या सामाजिक शास्त्रांच्या शाखांमधून विविध विषयांतील शोधनिबंधांचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच सहभागी संशोधकांनी सादर केलेले सर्व शोधनिबंध यूजीसी केअर लिस्टेड जर्नलमध्ये प्रकाशित केले जाणार आहेत. सामाजिक शास्त्रातील नवीन प्रवाह आणि संशोधनातील नवे विषय या परिषदेमध्ये हाताळले जाणार आहेत. तरी सर्व विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक व समाजातील सर्व क्षेत्रांतील लोकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब, समन्वयक प्रोफेसर (डॉ.) अनिलकुमार वावरे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रोफेसर डॉ. धनाजी मासाळ, डॉ. गणेश लोखंडे यांनी केले आहे.
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जास्तीत जास्त घटकांनी सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा