Breaking

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन : प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांनी रक्तदान करण्याचे केले आवाहन*



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे कॉलेजच्या 'हीरक महोत्सवी वर्षानिमित्त' "भव्य रक्तदान शिबिराचा आयोजन" उद्या शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर,२०२३ रोजी सकाळी ठीक ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तरी सर्व आजी,माजी व इतर नागरिकांनी सदर शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन कॉलेजच्या वतीने प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांनी केले आहे.

     मुळात कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असून रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता आहे. तसेच डेंगी सदृश्य आजाराने परिस्थिती बिकट झाली आहे. अशावेळी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजना (NSS), नॅशनल कॅडेट कॉर्पस(NCC) व वैभव लक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  शिरोळ तालुक्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ.महावीर अक्कोळे हे रक्तदान शिबिराचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक संवेदनशील कार्यकर्ते बंडू उर्फ शुक्राचार्य ऊरणकर यांनी तब्बल ९८ वेळा रक्तदान केले आहे.कार्यशील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव शंकर पार्वती हेरवाडे  स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

     अधिकृत माहिती व संपर्कासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने (९८२३१२००७६), डॉ. खंडेराव खळदकर ( ८४८२९८९१०१), एन.सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट प्रा. सुशांत पाटील ( ८०८७४१५५७१) यांचेशी संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा