Breaking

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

*जयसिंगपूर शहरातील मनसेच्या शिलेदारांचे मुत्तुट फायनान्स प्रकरणी अटक व सुटका*



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे व जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन उर्फ निलेश भिसे यांचेवर विविध गंभीर कलमे लावून अटक करण्यात आली होती.परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र सैनिकांची गंभीर कलमे असून देखील  'एका दिवसातच' कायद्याच्या ज्ञानाचा व बुध्दी चातुर्यचा उपयोग करून जामिनावर सुटका ऍड. सौ. हर्षदा काळे मॅडम व ऍड. श्री. निलेश गांधी यांनी केली.

     या सर्वप्रकारात मनसेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष जयराज (दादा) लांडगे, मनसेच्या विधी कक्षाचे राज्य उपाध्यक्ष ऍड.आनंदराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष गजाननराव (आण्णा) जाधव यांनी मार्गदर्शन केले व स्वयंरोजगार विभागाचे शिरोळ तालुका संघटक चंद्रकांत शिंदे, तालुका उपाध्यक्ष संतोष केटकाळे, जयसिंगपूर शहर सचिव ऋषिकेश पाटील, सहकार सेना शहराध्यक्ष महेश पोरे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनुप दाईंगडे, स्वयंरोजगार विभागाचे शहराध्यक्ष योगेश चव्हाण, शहर उपाध्यक्ष राजेश कर्नाळे, महाराष्ट्र सैनिक राहुल भिसे आदींचे विशेष सहकार्य मिळाले.

        जनतेच्या हितार्थ केलेल्या कामाबाबत नागरिकाकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा