![]() |
मार्गदर्शन करताना सुरेश सकटे, नशाबंदी कोल्हापूर जिल्हा संघटक व अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते. |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : बलशाही भारताच्या विकासासाठी नशाबंदी हा एक सक्षम पर्याय असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते व नशाबंदी मंडळ कोल्हापूर जिल्हा संघटक मा.सुरेश सकटे यांनी मांडले. जयसिंगपूर कॉलेजच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त नशाबंदी मंडळ कोल्हापूर जिल्हा, राष्ट्रीय सेवा योजना व आयक्यूएसी यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.
'आजचा युवक आणि व्यसनमुक्ती' या विषयावर मार्गदर्शन करताना सुरेश सकटे म्हणाले, सध्या परिस्थितीत प्रचंड प्रमाणात युवा पिढी नशेच्या आहारी जात असून या घटकांकडून आत्महत्या सारख्या टोकाचं पाऊल उचलले जात आहे. तसेच व्यसनाधीनतेमुळे व्यसनाधीन व्यक्तीचे मानसिक,शारीरिक आरोग्य व कौटुंबिक प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. परिणाम स्वरूप सामाजिक प्रश्न गंभीर होत असून यामुळे देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे. देशातील अनेक कुटुंबे व्यसनाधीनते मुळे उद्ध्वस्त होत आहेत अशाप्रसंगी वेळेत नशाबंदी सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून आजची युवा पिढी सजक व जागृत होईल. याप्रसंगी त्यांनी दैनंदिन जीवनातील व्यसनाधीनतेतील गांभीर्य त्यांनी वास्तविक उदाहरणाच्या माध्यमातून मांडले.
ते पुढे म्हणाले, तत्कालीन काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नशाबंदी मंडळाची स्थापना केली. या नशामुक्त मंडळाचे कार्य अविरतपणे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. विद्यमान परिस्थितीत सामाजिक जागृती करण्यासाठी या तरुण पिढीच्या माध्यमातून नशामुक्तीचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे करता येईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये जनजागृती करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच भावी पिढीचे राष्ट्रीय चारित्र्य नीतीमय,आरोग्यपूर्ण व सक्षम बनवण्यासाठी नशाबंदी सारख्या मंडळाची नितांत आवश्यकता आहे. जयसिंगपूर कॉलेजमध्ये विद्यार्थी व्यसनाधीनते पासून दूर कसे राहतील यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शासनाच्या वतीने नशाबंदी कायदा झाल्याशिवाय अत्याचार व बलात्कार थांबणार नाहीत.
या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य डॉ.एन.पी. सावंत यांनी केले. प्रास्ताविकाच्या माध्यमातून या कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.डॉ. एन.एल. कदम,डॉ. वंदना देवकर,प्रा. सुरज चौगुले,प्रा. माधुरी कोळी, प्रा. विश्रांती माने,प्रा.बागवान, प्रा.कांबळे व केतन पाटील यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन भोलू शर्मा व प्रथमेश कोळी यांनी केले. या कार्यक्रमात कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा