![]() |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य म्हणजे सामाजिक व पर्यावरण चळवळीचा मानबिंदू असल्याचे मत मा.कुलगुरू डॉ.डी. टी.शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादित केले. याप्रसंगी.प्रा.डॉ. कुलसचिव विलास शिंदे उपस्थित होते.
मा.कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व संलग्नित महाविद्यालयांच्या एन एस एसच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपल्या विविध अंगी कार्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन कार्याबरोबरच संतुलित पर्यावरणासाठी देशाच्या चिरंतन विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते अविरत कार्य मग्न आहेत. पायाला सामाजिक व प्रबोधनात्मक विकासाची भिंगरी बांधून काम करणारे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांच्या रूपाने विद्यापीठास कार्यतत्पर अधिकारी लाभले आहेत. कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आज पर्यंत केलेल काम हे रचनात्मक व विकासात्मक असण्याबरोबरच विद्यार्थी सर्वांगीण विकासास कारणीभूत ठरल्याचे मत त्यांनी मांडले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यशील संचालक डॉ. टी. एम. चौगले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. चौगले यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य पातळीवर शासनाच्या नियमाला अधीन राहून शासनाच्या परिपत्रका नुसार सर्वच घटकांनी उत्तम कामगिरी पार पाडली आहे. मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्र चेतना व 'माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी' या एनएसएसच्या ब्रीद वाक्याप्रमाणे प्रचंड मोठं कार्य त्यांनी पार पाडले आहे. याप्रसंगी त्यांनी एन एस एस च्या विगत काळातील कार्याचा संक्षिप्त आढावा उत्तम पद्धतीने मांडला.
यावेळी धरणगुत्ती गावचे माजी सरपंच शेखर पाटील यांनी माजी वसुंधरा अभियानाच्या यशाबाबत मनोगत व्यक्त केले.
यावेळी सन २०२१-२०२२ मध्ये राष्ट्रीय,राज्य व विद्यापीठ पातळीवर उत्तम व विशेष कामगिरी केलेल्या कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक विद्यार्थी, कॉलेज युनिट, प्राचार्य व ग्रामपंचायतीचा सत्कार केला.
डॉ.सौ.सुनिता तेलशिंगे, श्री. आण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबीर उत्कृष्ठ संघ व्यवस्थापक
श्री श्लोक वरूडे,बळवंत कॉलेज, विटा जि. सांगली आणि श्रीमती करीना आर. जमादार, दुधसाखर महाविद्यालय, बिद्री जि. कोल्हापूर, राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलन 2022-23 नवी दिल्ली सक्रिय सहभाग व उत्कृष्ठ प्रतिनिधीत्व केले.
कु.श्रुती दत्तात्रय यादव, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राज्य प्रजासत्ताक दिन संचलन 2022-23 मुंबई येथे कंपनी कमांडर म्हणून सक्रिय सहभाग व उत्कृष्ठ प्रतिनिधीत्व केले.
डॉ. गजानन पट्टेबहादूर, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण जि. सातारा व मा. प्राचार्या डॉ. भाग्यश्री जाधव, श्री. शिवाजी चव्हाण,रासेयो कार्यक्रम अधिकारी,सरदार बाबासाहेब महाविद्यालय, रहिमतपूर सातारा यांचा सत्कार करण्यात आला.
.प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवान, डॉ. डी. एल. काशिद-पाटील रासेयो कार्यक्रम अधिकारी, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी श्री. दिपक प्रभाकर खेडकर, आर्टस कॉमर्स अॅण्ड डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक उत्कृष्ठ
रासेयो कार्यक्रम अधिकारी १) डॉ. तातोबा कल्लाप्पा बदामे,पद्मभूषण वसंतराव दादा पाटील कॉलेज, तासगाव, विद्यापीठस्तरीय प्रथम तथा सांगली जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक उत्कृष्ठ रासेयो महाविद्यालयीन एकक
२) प्रा. गोरखनाथ किसन किर्दत, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर जि. सांगली, सांगली जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक उत्कृष्ठ रासेयो कार्यक्रम अधिकारी,मा. प्राचार्य / प्राचार्या,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर जि. सांगली,सांगली जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक उत्कृष्ठ रासेयो महाविद्यालयीन एकक,
३) डॉ. पोपटराव रामचंद्र माळी, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय,चिखली जि.सांगली, सांगली जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक उत्कृष्ठ रासेयो कार्यक्रम अधिकारी,मा. प्राचार्य / प्राचार्या, देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय, सांगली जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक उत्कृष्ठ रासेयो कार्यक्रम अधिकारी
सांगली जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक उत्कृष्ठ रासेयो महाविद्यालयीन एकक प्रा. गोरखनाथ किसन किर्दत, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर जि. सांगली , मा. प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर जि. सांगली चिखली जि. सांगली,सांगली जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक उत्कृष्ठ रासेयो महाविद्यालयीन एकक डॉ. काकासाहेब बापूसाहेब भोसले, आर्टस सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, रामानंदनगर, सांगली, सांगली जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक उत्कृष्ठ रासेयो कार्यक्रम अधिकारी, आर्टस सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज, रामानंदनगर, सांगली, सांगली जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक उत्कृष्ठ रासेयो महाविद्यालयीन एकक, श्री. पार्थ संदीप देसाई,राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर ,
विद्यापीठस्तरीय प्रथम तथा कोल्हापूर. उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक रासेयो स्वयंसेवक पुरस्कार,श्री. महेश सुहास पवार, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर जि. सांगली,श्री. रोहित दिनकर पाटील,चिखली जि. सांगली,आणि सांगली जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक, देशभक्तआनंदराव बळवंतराव नाईक, चीखलीला मिळाले.
या कार्यक्रमाचा आभार सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी यांनी केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचलन सौ. मुजुमदार मॅडम व डॉ. संदीप पाटील यांनी केले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा समन्वयक संजय पाटील, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी व सातारा जिल्हा प्रमुख डॉ.माने उपस्थित सदर कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने करण्यात आले. यासाठी मुंडे सर व अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा