Breaking

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३

*मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग जयसिंगपूर कॉलेज यांचा कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के यांचे हस्ते विशेष सत्कार*

 

मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायत व राष्ट्रीय सेवा योजना जयसिंगपूर कॉलेज यांचा विशेष सत्कार करताना कुलगुरू प्रा.डॉ. डी टी शिर्के


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील पुरस्कार वितरण सोहळा मा. कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के यांचे हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी छ. शाहू हॉलमध्ये संपन्न झाला.

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे एक उत्तम संघटनात्मक माध्यम आहे. एन एस एस ने आदर्शवत मौजे धरणगुत्ती ग्रामपंचायती बरोबर सामंजस्य करार  करून गावागावात माझी वसुंधरा अभियान राबवले पाहिजे.

      प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ.तानाजी चौगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व एन.एस.एस एकक, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक विद्यार्थी यांनी केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.


     यावेळी मा. कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के यांचे हस्ते पुरस्कारर्थी घटकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष सत्कार म्हणून माझी वसुंधरा अभियानांतर्गत ३.० (२०२२-२०२३) मध्ये द्वितीय स्थानी आलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील विकासाचं आदर्श मॉडेल म्हणून ठरलेल्या मौजे धरणगुत्ती गावचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीमती विजया कांबळे, उपसरपंच मा.जाधव, विकासाचे शिल्पकार मा. शेखर पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे यांना शाल,श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ. खंडेराव खळदकर व एनएसएस प्रतिनिधी कु. भोलू शर्मा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

      विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य शेखरजी पाटील यांनी माझी वसुंधरा अभियानातील यशाबद्दल संक्षिप्त माहिती दिली. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभाग व एनएसएस कक्षाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून आदर्शवादी खेडी निर्मितीचा संकल्प बाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

       या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ. विलास शिंदे, सर्व प्राचार्य, कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी व सातारा जिल्हा प्रमुख डॉ.माने त्याचबरोबर कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम अधिकारी, यशस्वी स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मौजे धरणगुत्ती गावातील ग्रामपंचायतीचा अभूतपूर्व कार्याबद्दल शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा