![]() |
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू साहेब दळवी यांना अभिष्टचिंतन |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष राजू दळवी यांचा आज वाढदिवस विशेष म्हणजे केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजू दळवी हे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील असून त्यांचे शिक्षण हे मुंबई या ठिकाणी झाले त्यांनी धारावी या ठिकाणाहून सामाजिक कार्याची चाहूल गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी सामाजिक कार्य निवडले या सामाजिक कार्यातूनच त्यांनी राजकीय कारकीर्द धारावी येथे चांगल्या पद्धतीने घडवली आहे २००७ नगरसेवक निवडणूक १७८ धारावी, २००९ लोकसभा व विधानसभा निवडणुक लढवली.सन २०१४ व २०१९ लोकसभा व विधानसभा निवडणुक लढवीली आहे. येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांसाठी २०२४ ला ते पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
आपल्या सेवाभावी कार्याच्या माध्यमातून आपत्कालीन सेवा समिती स्थापन करुन कोरोना मध्ये औषध उपचार, जेवणाचे पाकीट, मुंबई नोडल अधिकारी यांचा सोबत पुर्ण वेळ काम केलें आहे.कोविड काळा मध्ये मुंबई धारावी मध्ये धान्य वाटप व जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले,त्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी पत्रकार क्षेत्र निवडले आणि पत्रकार क्षेत्रामध्ये आज पत्रकारांचा बुलंद आवाज आणि अडीअडचणी सोडविण्याकरता केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाची स्थापना केली आहे.केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पदाधिकारी व हजारोच्या संख्येमध्ये पत्रकार यामध्ये काम करीत आहेत. आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी एक वेगळे व्यासपीठ हे राजू दळवी यांनी निर्माण केले आहे सर्वसामान्य लोकांचा आधार आणि विश्वास जनतेमध्ये संपादन करून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये गोरगरीब कुटुंबातील न्याय देण्यासाठी एक वेगळेच महत्व त्यांनी तयार केले आहे पत्रकार संघाचा आधार आणि पत्रकारांचा मानाचा आधार असे नेतृत्व म्हणजे आदरणीय राजू दळवी यांचा आज वाढदिवस आहे.
कोल्हापूर जिल्हा केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने आदरणीय संस्थापक अध्यक्ष राजू दळवी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा