Breaking

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजच्या प्रा. सौ. अंजना चौगुले - चावरे यांनी संपादन केली हिंदी विषयात एम.फील. पदवी*


प्रा.सौ. अंजना चौगुले चावरे यांनी एम.फील.पदवी संपादन केली

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


 जयसिंगपूर :  प्रा.सौ. अंजना चौगुले-चावरे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची हिंदी विषयात एम. फील. पदवी मिळविली. "प्रवासी भारतीय महाकवि हरिशंकर आदेश कृत अनुराग महाकाव्य का महाकाव्यत्व" हा त्याचा एम्.फील.चा विषय होता. त्यांना सुरवातीच्या काळात पद्मा पाटील (हिंदी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रा.डॉ.एस.बी.बनसोडे (हिंदी विभाग प्रमुख, जयसिंगपूर कॉलेज) यांचे मार्गदर्शन मिळाले.

   विशेष म्हणजे महाकाव्याची समीक्षा अतिशय उत्कृष्ट रित्या केली आहे असे मत पुणे धारवाड विद्यापीठातील डॉ. विजय देवणे पाटील सरांनी व्यक्त केली.

         प्रा.सौ.अंजना चौगुले या सबल ग्रामीण लेखिका,मराठी व हिंदी भाषेवर प्रभुत्व, उत्तम निवेदिका, वक्त्या व सांस्कृतिक कलेची जाण, सामाजिक चळवळीत सक्रियपणे सहभागी असणाऱ्या, जैन धर्म व तत्वज्ञान याविषयी सखोल अभ्यास, विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून विविध उपक्रमात त्या केंद्रस्थानी राहून काम करीत असतात. हिंदी विषयातील प्रचंड अभ्यास व ज्ञानाच्या जोरावर विविध वैचारिक पटलावर त्या कार्यरत असतात. आज तागायत असंख्य पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन एका सामाजिक संस्थेने सावित्रीच्या लेकी- आदर्श शिक्षिका म्हणून गौरवण्यात आले आहे.

    जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना त्या म्हणाल्या, मला पीएच.डी.साठी प्रवेश घेऊन हिंदी विषयात पीएच.डी. पदवी संपादन करण्याचे ध्येय आहे. एम.फील.पदवी  प्राप्ती मध्ये माझे सासर व माहेर च्या लोकांची प्रेरणा व शुभेच्छामुळे हे यश मला मिळाले. माझे पती श्री.संजय चावरे यांची खंबीर साथ व प्रेरणा मिळाल्यामुळे मी हे संशोधनाचे कार्य करू शकले.माझ्या या यशासाठी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, सर्व स्थानिक समितीचे सर्व सदस्य, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

     हिंदी विषयाच्या प्राध्यापिका सौ.अंजना चौगुले-चावरे यांचे सर्वत्र कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा