![]() |
कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकता शपथ ग्रहण व एकता दौड मध्ये सहभागी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती,स्वर्गीय इंदिरा गांधींची पुण्यतिथी व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता शपथ ग्रहण आणि एकता दौडचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या(NSS)वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.
प्रारंभी या कमिटीचे प्रमुख प्रा.डॉ.तुषार घाटगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकेचे माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी डॉ.सौ. सुनंदा शेळके यांनी सरदार वल्लभाई पटेल व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा उलगडा उत्तम मांडणी द्वारे केला. यावेळी या महनीय व्यक्तींच्या कार्याचा विचारांचा जागर करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे प्रमुख संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगुले यांनी सुचित केल्याप्रमाणे जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उपस्थित सर्व एनएसएस स्वयंसेवक व अन्य घटकांना राष्ट्रीय एकतेची शपथ व एकता दौडचे आयोजन केले.
यावेळी प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे म्हणाले, सरदार पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिन संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. सध्या परिस्थितीत देशातील राजकीय व सामाजिक वातावरण पाहता राष्ट्रीय एकता दिन साजरा करणे हे देश हितार्थ महत्त्वाचे आहे. त्यांनी सरदार वल्लभाई पटेल व स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रीय एकता व देश बांधणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. तसेच एकता दौडच्या आयोजन का करावे या संदर्भात माहिती दिली.राष्ट्रीय एकता दौड मध्ये ते स्वतः सहभागी झाले होते. या एकता दौड मध्ये एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी, कॉलेजमधील सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर व डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा.डॉ. नंदकुमार कदम , उपप्राचार्य प्रा.डॉ. नितीश सावंत, डॉ.सौ. सुनंदा शेळके, डॉ.सौ.सुपर्णा संसुद्धी, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे,प्रा.सुनील चौगुले, प्रा.बाळगोंडा पाटील, प्रा. अंजना चौगुले-चावरे, प्रा. शीतल पाटील, प्रा.सौ.स्वाती बस्तवाडे, प्रा.अमोल पवार व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा